`सोलापूर जिल्हा बॅंकेची मतदार यादी तयार करा`

`Make a list of voters of Solapur District Bank '
`Make a list of voters of Solapur District Bank '

सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेसह राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची प्रारूप मतदार यादी तयार करण्याची सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बॅंकांना केली. निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने ही तयारी सुरू झाली असल्याचे मानले जात आहे. 

जिल्हा बॅंकेच्या सभासद असणाऱ्या परंतु थकीत असणाऱ्या प्राथमिक विकास सहकारी संस्था, जिल्हा बॅंकेच्या सभासद असणाऱ्या आणि थकीत असणाऱ्या प्राथमिक विकास सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची यादी, जिल्हा बॅंकेच्या सभासद असणाऱ्या परंतु थकीत असणाऱ्या इतर सहकारी संस्थांची यादी, अवसायक व प्रशासक नियुक्त असलेल्या सहकारी संस्थांची यादी, अवसायनात असणाऱ्या सहकारी संस्थांची यादी संकलित करण्याची सूचना निवडणूक प्राधिकरणाने केली आहे. 

मतदार यादी तयार करताना क्रियाशील/अक्रियाशील सभासद ठरविण्यासाठी नोंदवह्या अद्ययावत ठेवण्याचीही सूचना बॅंकांना करण्यात आली आहे. बॅंकेचे जे सभासद अक्रियाशील आहेत, त्यांना याबाबत कळविण्याची जबाबदारीही बॅंकेवर सोपविण्यात आली आहे. अक्रियाशील सभासदांची माहिती निबंधक व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देखील दिली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी ठराव घेण्यासही सुरुवात केली आहे. 

जिल्हा बॅंकांत कक्ष काढा 

प्राथमिक मतदार यादी अचूक, निर्दोष व नियमानुसार करण्यासाठी जिल्हा बॅंकेने ज्येष्ठ व माहीतगार अधिकाऱ्यांचा एक कक्ष तयार करावा. या कक्षाच्या वतीने विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून दररोज प्राप्त होणाऱ्या प्रतिनिधी ठरावाची अचूकपणे छाननी करावी. दररोज प्रगती दर्शक मतदार यादी तयार करावी, अशी सूचनाही प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा बॅंकेला देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com