बोंड अळी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करा

बोंड अळी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करा
बोंड अळी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करा

औरंगाबाद  : बोंड अळीचा प्रादूर्भाव निदर्शनास आला आहे. या बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी व्यक्‍त केले.

औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने बुधवारी (ता. १) आयोजीत केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार,  डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. जी. पी. जगताप, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख प्रा. दिप्ती पाटगावकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. दिप्ती पाटगावकर    यांनी केले. डॉ. एस. बी. पवार यांनी खताचे योग्य प्रमाण, खत देण्याच्या  पद्धती, एकात्मिक कीड नियंत्रण पद्धत, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक व्यवस्थापन, कामगंध सापळ्याचे महत्त्व, त्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. एन. आर. पतंगे यांनी गुलाबी बोंड अळीविषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन कामगंध सापळ्याच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. डॉ. जी. पी. जगताप यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले.

तंत्र अधिकारी अनिरूद्ध कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गीता यादव, डॉ.   दर्शना भुजबळ, इरफान शेख यांनी प्रयत्न केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com