Agriculture news in Marathi Make people aware of the danger of floods: Collector Pradip Chandran | Agrowon

लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट भागातील लोकांना धोक्‍याची जाणीव करुन देण्यासोबतच पूल व रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.

भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट भागातील लोकांना धोक्‍याची जाणीव करुन देण्यासोबतच पूल व रस्ते दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.

माॅन्सून पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व इतर अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती तयार करुन पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामासाठी निधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मॉकड्रिल व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन एका दिवशी दोन तालुके याप्रमाणे तत्काळ करावे. होमगार्ड व नाविकांची यादी तयार करुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत शिबिराचे नियोजन करावे. सर्व तहसीलदारांनी ग्रामदक्षता समितीची सभा घेऊन पूरपरिस्थितीबाबत चर्चा करावी व ग्रामस्थांना अवगत करावे. कोणतीही अनुचित घटना घडून वित्त व मनुष्यहानी होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुरामुळे दूषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा विभागाने निर्जंतुकीकरण व्यवस्था या काळात तयार ठेवावी. यावेळी टोळधाड जागृतीबाबत कृषी विभागाव्दारे माहिती देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...