agriculture news in marathi Make public the Report on Farm laws Appeals Anil Ghanwat | Page 3 ||| Agrowon

कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा : घनवट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

कृषी कायद्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल न्यायालयाने सार्वजनिक करावा, अशी विनंती या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी केली आहे. 

अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना विरोध दर्शवीत दिल्लीच्या रस्त्यांवर गेल्या १० महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या कायद्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झालेला असून, न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करावा. तसेच पुढील चर्चा व कारवाईसाठी केंद्र सरकारकडे सुपूर्द करावा अशी विनंती या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी केली आहे. 

याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणारे पत्र लिहिले आहे. याबाबत बोलताना श्री. घनवट म्हणाले, ‘‘दिल्लीच्या सीमांवर सध्या हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे आंदोलक शेतकरी असून, आपण शेतकरी नेता असल्याने मनाला त्यामुळे वेदना होत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुटले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे.’’

‘‘कृषी कायद्यांच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल १९ मार्चला सादर केला आहे. या अहवाल गुप्त स्वरूपात आहे. आम्ही शेतकरी, बाजार समित्या, निर्यातदार व इतर विविध घटकांशी चर्चा करून त्यात शिफारशी केलेल्या आहेत. या अहवालावर चर्चा व्हायला. त्यात काही दुरुस्‍त्या हव्या असतील तर त्याही केल्या जाव्यात. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने तातडीने निर्णय होऊन आंदोलन सुटले पाहिजे, असे वाटते. त्यासाठीच आपण सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून विनंती केली आहे,’’ असेही ते म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...