Agriculture news in marathi Make Raju Shetty Minister of Agriculture, Resolution by Solapur District Executive of 'Swabhimani' | Agrowon

राजू शेट्टी यांना कृषिमंत्री करा, सोलापूर जिल्हा ‘स्वाभिमानी’चा ठराव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला साथ दिली. राज्यात दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने राज्यातील कॅबिनेट कृषी मंत्रिपद त्यांनाच द्यावे, असा ठराव सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सोमवारी (ता. २) करण्यात आला. 

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला साथ दिली. राज्यात दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने राज्यातील कॅबिनेट कृषी मंत्रिपद त्यांनाच द्यावे, असा ठराव सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सोमवारी (ता. २) करण्यात आला. 

जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्‍वर पेठेतील शिवशक्ती कॉम्प्लेक्‍समधील जिल्हा कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका व स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार यासंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, जिल्हा संघटक विजय रणदिवे, सचिव उमाशंकर पाटील, बिळ्यानी सुंटे, अक्कलकोट अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, चांद यादगिरी, शिवाप्पा रामशेट्टी, श्रीशैल गुडेवाडी, सुरेश बिराजदार, बळीराम व्यवहारे, उत्तर तालुकाध्यक्ष पोपट साठे, मोहोळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पवार आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जात नसल्याने माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वांत प्रथम सत्तेतून बाहेर पडली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना शेट्टी यांनी वाचा फोडली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शेट्टी यांनी गेल्या २५ वर्षांपासून प्रचंड आंदोलने, मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यातील महाविकास आघाडीत कृषी मंत्रालय राजू शेट्टी यांना देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे पत्र व बैठकीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फॅक्‍सद्वारे पाठविण्यात आला.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...