Agriculture news in Marathi Make 'revenue' popular: Commissioner Gam | Agrowon

‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. 

नाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व प्रदान करते. याचे उत्तम उदाहरण देवमामलेदार यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २) महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गमे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, इगतपुरी प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार रचना पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तहसीलदार पल्लवी जगताप, तहसीलदार राजश्री आहिरराव आणि वेबलिंकद्वारे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. 

महसूल दिनाचे औचित्य साधून नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने व जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक विषयांमध्ये त्रिस्तरीय कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले

यांचा झाला सन्मान
कोरोनाची जबाबदारी सांभाळत इतरही कामे उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महसूल दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार पोपटराव सोनवणे, शिपाई अनिल वैद्य, तलाठी सोनाली कोल्हे, कोतवाल मोहन दत्तात्रय कर्वे यांचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार रचना पवार व आभार अपरजिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मानले.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...