नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव करा : उपमुख्यमंत्री पवार

नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करा  : उपमुख्यमंत्री पवार
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करा : उपमुख्यमंत्री पवार

अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण १२५.५४ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यानुसार अतिरिक्त ३१ कोटी ४० लाख रुपयांच्या मागणी प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, आता जिल्ह्यासाठी १५६ कोटी ९४ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकासासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी राज्यस्तर बैठक अमरावती विभाग बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अजित पवार होते. या बैठकीस अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्च कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदा गोपीकिशन बाजोरिया, अतिरिक्त मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com