Agriculture news in marathi; Make smart farming using modern techniques: Dr. Bhale | Agrowon

आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती करा : डॉ. भाले
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि संरक्षित लागवड पद्धत (प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन) अशा कालसुसंगत तंत्राचा प्रभावी वापर सुकर होण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. शेतकऱ्यांनी फळबागांचे पुनरुज्जीवन करीत अधिक उत्पादन घ्यावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 

अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि संरक्षित लागवड पद्धत (प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन) अशा कालसुसंगत तंत्राचा प्रभावी वापर सुकर होण्यासाठी विद्यापीठ तत्पर आहे. शेतकऱ्यांनी फळबागांचे पुनरुज्जीवन करीत अधिक उत्पादन घ्यावे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. 

अमरावती विभागातील जिल्ह्यांची विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ६६ वी रब्बी हंगाम नियोजनासाठीची सभा येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी कुलगुरू डॉ. भाले अध्यक्षपदावरून बोलत होते. सभेला विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य प्रगतिशील शेतकरी गणेश कंडारकर, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. एन. काटकर आदी उपस्थित होते. 

डॉ. भाले पुढे म्हणाले, विद्यापीठ व कृषी विभाग शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी झटत आहे. शेतकरी, गावकरी, विविध संस्था, शासकीय निम शासकीय, खासगी विभाग, महामंडळे आदींनी एकाच व्यासपीठावर येत परस्पर सहयोगाने उन्नत भारताचे स्वप्न साकारण्यात सहयोगी झाले पाहिजे. केंद्र राज्य शासनाच्या भरीव आर्थिक सहयोगाबद्दल विशेष उल्लेख करीत नवीन कृषी व तत्सम महाविद्यालये आणि संशोधनात्मक प्रकल्प प्राप्तीने विद्यापीठात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.  शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडे हक्काने यावे व अत्याधुनिक अल्प खर्चाचे तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसायाच्या, प्रक्रिया उद्योगांच्या व ग्रामीण उद्योजकताविषयक संधी जाणून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. 

या प्रसंगी सुभाष नागरे यांनी खरीप हंगाम व पाऊसमानाविषयी सभागृहाला अवगत केले. कृषी विभाग आता ऑनलाइन झाला असल्याने कार्यतत्परता वाढल्याचे सांगताना श्री. नागरे यांनी कामात अधिक पारदर्शकता येत तक्रारी कमी झाल्याचे विषद केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांना आता राजाश्रय मिळत असून, निर्यातक्षम कृषी माल उत्पादन व विक्रीसाठी शेतकरी वर्गाने पुढे यावे असे आवाहन केले.

प्रास्ताविक डॉ. व्ही. के. खर्चे यांनी केले. सभेचे सूत्र संचालन उपसंचालक डॉ. अजय सदावर्ते यांनी केले. उपसंशोधन संचालक डॉ. जे .पी. देशमुख यांनी आभार मानले. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...