नवीन तहसील आवारातच स्टॅंप उपलब्ध करा

नवीन तहसील आवारातच स्टॅंप उपलब्ध करा
नवीन तहसील आवारातच स्टॅंप उपलब्ध करा

मंगळवेढा, जि. सोलापूर : नवीन तहसील आवारात स्टॅंप  उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेच्या मुलांचे विविध दाखले काढताना हाल होत आहेत. याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने याचा त्रास शहर व ग्रामीण भागातील जनतेला होत आहे.

येथील तहसील कार्यालयाचे दोन वर्षांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. तेव्हापासून तहसील परिसरात स्टॅंप उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहर व ग्रामीण भागातून आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेच्या विविध दाखल्यांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या तहसीलजवळ जाऊन स्टॅंप व तिकिटे आणावी लागतात. एखाद्याला एखादे तिकीट कमी पडल्यास परत तेवढेच अंतर जाऊन तिकीट आणावे लागते. याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे स्टॅम्प उपलब्ध करुन देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

सध्या मागील महिन्यापासून मुलांच्या दाखल्यासाठी अनेक पालक तहसीलमध्ये येतात; परंतु त्यांना स्टॅंप व तिकिटे तहसील आवारात मिळत नाहीत. चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जादा पैसे देऊन स्टॅंप खरेदी करावे लागतात. त्यामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. - बाळासाहेब यादव, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, मारापूर

स्टॅंप विक्रीची परवानगी देताना विक्रीचे ठिकाण निश्‍चित केले जाते. तहसील कार्यालयाचा पत्ता बदलल्यानंतर स्टॅंप विक्रेत्यांनी नवीन ठिकाणी मागणी करणे आवश्‍यक आहे. मागणी केल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव पाठवून देणार. - रमेश पवार, दुय्यम निबंधक

तहसील परिसरात स्टॅंप विक्रेते बसण्याची सक्ती करून जनतेला होणारा त्रास संपवावा. तत्काळ स्टॅंप विक्री नवीन तहसील आवारात सुरू करावी़, अन्यथा  शेतकऱ्यांना घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. - अंकुश पडवळे, अध्यक्ष, कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब, मंगळवेढा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com