अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा; शेतकऱ्यांची मागणी

अकोलाः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका शेतमालाला बसत आहे. बाजारपेठा बंद, दळणवळणाची असुविधा, व्यापाऱ्यांचा नकार यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. नवतीचा हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग निघण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Make way for banana growers; Demand for farmers
Make way for banana growers; Demand for farmers

अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका शेतमालाला बसत आहे. बाजारपेठा बंद, दळणवळणाची असुविधा, व्यापाऱ्यांचा नकार यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. नवतीचा हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग निघण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यासह इतर भागात केळीचे उत्पादन घेतले जाते. हा माल बहुतांश स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री होतो. गेल्या दोन वर्षात काही माल विदेशातही निर्यात झाला होता. यंदा हंगामाच्या तोंडावर कोरोनाचे संकट उभे ठाकले. सध्याच्या परिस्थितीत तोडगा काढणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. 

संचारबंदी लागू केल्यामुळे केळी विक्रीही बाजारपेठांमध्ये ठप्प झालेली आहे. व्यापाऱ्यांकडून जोपर्यंत मागणी येत नाही तोवर केळी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होणे शक्य नाही. प्रशासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत केळी विक्रीसाठी सुविधा देतानाच दळणवळणातही अडचण येणार नाही, असे धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याची मागणी केळी उत्पादक करीत आहेत. 

सध्या या भागातील केळी उत्पादकांकडे सेकंडचा (फुटीचा) माल तयार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे दहा ते बारा टन माल आहे. तसेच पुढील महिन्यात नवतीचाही हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत केळीची बाजारपेठे खुली न झाल्यास या भागातील शेकडो टन केळी कशी व कुठे विकायची हा पेच तयार होऊन शेतकऱ्यांसमोरील अडचण आणखीच वाढण्याची चिन्हे आहेत.

आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे सेकंडचा माल तयार आहे. मागणी नसल्याने तसाच शेतात उभा आहे. आठवडाभरात तोडगा निघाला तर केळी उत्पादकांची अडचण दूर होऊ शकेल. - दिनेश अकोटकर, केळी उत्पादक, पणज जि. अकोला

- आठवडाभरानंतर नवतीचा हंगाम सुरु होत आहे. हा माल परिपक्व होत आहे. सध्याच्या वातावरणामुळे कुणीही व्यापारी केळी खरेदीबाबत बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी आमची केळी उत्पादकांची मागणी आहे. - विकास देशमुख, केळी उत्पादक, पणज जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com