agriculture news in marathi making of cow feed | Agrowon

तयार करा कांडी पशुखाद्य

डॉ. श्वेता मोरखडे, डॉ. कुलदीप देशपांडे 
बुधवार, 25 मार्च 2020

खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या तयार करून जनावरांच्या खाद्यात देता येतात. विविध पिकांच्या अवशेषांचा उपयोग करून संपूर्ण कांडी खाद्य तयार करता येते. या संपूर्ण खाद्यात खनिज मिश्रण, मीठ तसेच अपारंपरिक खाद्याचा उपयोग करता येतो.

खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या तयार करून जनावरांच्या खाद्यात देता येतात. विविध पिकांच्या अवशेषांचा उपयोग करून संपूर्ण कांडी खाद्य तयार करता येते. या संपूर्ण खाद्यात खनिज मिश्रण, मीठ तसेच अपारंपरिक खाद्याचा उपयोग करता येतो.

प शुखाद्याच्या किमती वाढत आहेत. पारंपरिक आहार पद्धतीमध्ये जनावरांचे खाद्य वाया जाते. यामुळे जनावरांना खाद्याची उपलब्धता कमी होऊन त्यांच्या अन्नद्रव्यांची गरज पूर्ण होत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. बहुतेक पशुपालक जनावरांना कमी प्रमाणात आलाप खाऊ घालतात. या पद्धतीने जनावरांना योग्य त्या प्रमाणात पोषणमूल्ये गरजेनुसार मिळत नाही. तसेच चारा आणि आलापांचे आहारातील आवश्यक असलेले योग्य प्रमाण राखणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण कांडी पशुखाद्य तयार करणे शक्य आहे.

संतुलित कांडी आहारपद्धतीमध्ये संपूर्ण खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या तयार करून जनावरांच्या खाद्यात देता येतात. विविध पिके व पिकांच्या अवशेषांचा उपयोग करून संपूर्ण कांडी खाद्य तयार करता येते. बारीक दळलेले पशुखाद्यपदार्थ किंवा भुकटीचे रूपांतर यांत्रिक दबाव किंवा स्टिम इंजेक्शनने जास्त घनता असलेल्या खाद्यामध्ये करण्याच्या प्रक्रियेला कांडीखाद्य असे म्हणतात.

संपूर्ण खाद्य 
पोटभरू खाद्य जसे वाळलेला चारा, कडबा कुट्टी, विविध पिकांचे कुटार, कृषी औद्योगिक दुय्यम उत्पादने आणि आलाप यांची योग्य प्रमाणात भुकटी करून तयार केलेले मिश्रण म्हणजेच संपूर्ण खाद्य. अशा प्रकारचे संपूर्ण खाद्य भुकटी किंवा कांडी स्वरूपात जनावरांना देता येते. या संपूर्ण खाद्यात खनिज मिश्रण, मीठ तसेच अपारंपरिक खाद्याचा सुद्धा उपयोग करता येऊ शकतो. उदाहरणार्थ; उसाची मळी व युरियाचा वापर केल्यास अशा मिश्रणाचे पोषणमूल्य वाढविण्यास मदत होते. मोठ्या जनावरांना दिवसातून दोन वेळा एक किलो खाद्य द्यावे. हे खाद्य शिफारशीत प्रमाणात देणे गरजेचे आहे. कारण, अधाशीपणे खाद्य खाणारी जनावरे पोटशूळ किंवा इतर पचन संस्थेच्या आजारांना बळी पडू शकतात.

संपूर्ण कांडी खाद्य बनवण्याची कृती 
वाळलेला चाऱ्याचे छोटे तुकडे करून चक्कीतून बारीक भुकटी करून घ्यावी. आलप तयार करण्यासाठी लागणाऱ्या खाद्य पदार्थाची भुकटी तयार करून घ्यावी. 
जनावरांच्या गरजेनुसार प्रथिने, ऊर्जेची गरज भागवण्यासाठी प्रमाण ठरवून आलप तयार करावा. खाद्य पदार्थ बारीक दळून घ्यावेत. संपूर्ण कांडी खाद्य तयार करण्याकरिता कोरड्या चाऱ्याची भुकटी ६० ते ७० टक्के आणि आलप ३० ते ४० टक्के एकत्रित करून मिश्रण यंत्राच्या साहाय्याने एकजीव मिसळून घ्यावेत. या मिश्रणात २५ ते ३० टक्के पाणी मिश्रण बनवताना मिसळत रहावे. अशाप्रकारे तयार ओलसर मिश्रणाच्या कांड्या यंत्राच्या साह्याने तयार कराव्यात.

 • खाद्य कांड्या पाहिजे त्या आकारमानात बनवून घेता येतात. साधारणपणे खाद्य कांड्या ८ ते १० मी. मी. व्यास आणि १ ते २ इंच लांबीच्या असतात. तयार खाद्य कांड्या उन्हात किंवा शुष्कयंत्राच्या साहाय्याने वाळवून साठवाव्यात. 
 • कांडीखाद्य तयार करताना घ्यावयाची काळजी  
 • कांड्या बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान जास्त उष्णतेमुळे प्रथिनांची उपलब्धता कमी होऊ शकते. 
 • कांडी खाद्य बनवण्याच्या प्रक्रियेमुळे खाद्याची किंमत वाढते.
 • कांडी खाद्य उत्पादनासाठी लागणी यंत्रणा  
 • कोरडा चारा आणि आलापातील खाद्य घटक दळून भुकटी करण्यासाठी चक्की.
 • खाद्याचे एकजीव मिश्रण तयार करण्याकरिता मिश्रण यंत्र. 
 • संपूर्ण खाद्याचा कांड्या करण्यासाठी कांडी यंत्र.

संपूर्ण कांडी खाद्याचे फायदे 

 • अपारंपरिक शेतीजन्य उपपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाचा चारा यांचा कांडी खाद्य बनवताना चांगला उपयोग करून घेता येतो.
 • कांडी खाद्य गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर, मत्स्य, कोंबडी, बदके आणि इतर प्राण्यांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त आहे.
 • जनावरांच्या आहारात कोरडा चारा आणि आलाप याचे योग्य प्रमाण ठेवणे शक्य होते.
 • जनावरांना योग्य प्रमाणात पोषणमूल्यांचा पुरवठा होतो. खाद्य पदार्थाची नासाडी टाळता येते.
 • वाहतुकीचा खर्च कमी होतो.
 • खाण्याचा कालावधी कमी होतो, खाद्याचा स्वादिष्टपणा वाढतो.
 • कांडी खाद्यामुळे निवडक आहार खाण्याची जनावरांची सवय कमी होते.
 • जनावरांच्या खाद्य खाण्याच्या प्रमाणात वाढ होते. अप्रत्यक्षरीत्या उत्पादनात वाढ होते. 
 • खाद्य कांडी स्वरूपात असल्यामुळे घनता वाढते. कमी जागेत जास्त खाद्य साठवता येते.

इतर टेक्नोवन
लसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌...हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू...
लसूण प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर...लसणाच्या योग्य साठवणीबरोबरच लसणापासून प्रक्रिया...
आंबा प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रेअलीकडे कोकणाबरोबर मराठवाडा व पश्चिम...
यंत्रांमध्ये वायूरुप इंधनाचा वापर होईल...सध्या बहुतांश वाहने व कृषी यंत्रासाठी खनिज...
मशागतीसाठी सबसॉयलर, मोल नांगराचा वापरपृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी...
शेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी...सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन...
हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापनकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या...
चिंच प्रक्रियेसाठी बहुपयोगी यंत्रेचिंच गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र...
खाद्यपदार्थ पॅकेजिंग, लेबलींगचे नियमएफ.एस.एस.ए.आय. २००६ च्या कायदे व नियमाअंतर्गत...
दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांच्या...पारंपरिकरीत्या दुधापासून खवा, पनीर, दही, लस्सी...
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
सोपी, सहज सौर वाळवण यंत्रेसध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल...
सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मितीसौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल...
सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापरक्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर...
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता,...शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...
ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता...
तयार करा कांडी पशुखाद्य खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...