नैसर्गिक रंग बनविणे हा उद्योग होऊ शकतो : प्रा. मिटकरी

जालना : आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. होळीचे रंग अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत. पर्यावरणपूरक देखील आहेत. महिलांसाठी हा एक यशस्वी उद्योग होऊ शकतो,’’ असे मत केविकेचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी व्यक्त केले.
Making natural colors can be an industry : Prof. Mitkari
Making natural colors can be an industry : Prof. Mitkari

जालना : आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. होळीचे रंग अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत. पर्यावरणपूरक देखील आहेत. महिलांसाठी हा एक यशस्वी उद्योग होऊ शकतो,’’ असे मत केविकेचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडीअंतर्गत २ व ३ मार्च रोजी ग्रामीण महिला व युवतींसाठी ‘होळीचे नैसर्गिक रंग तयार करणे’ या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी विविध  विषयांवर व्याख्याने व प्रत्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.  

केव्हीकेच्या गृहविज्ञानतज्ज्ञ प्रा. एस. एन. कऱ्हाळे यांनी ‘नैसर्गिक रंगाचे महत्त्व यावर माहिती दिली. विविध नैसर्गिक साहित्यापासून पर्यावरण पूरक  रंग तयार करण्यात आले. पळस फूल, बिटरूट, हळद, निलगिरीची साल, पालक, कडुलिंबाचा पाला, नीळ, गुलाब, झेंडूची फुले इत्यादी साहित्यांपासून शिवकृपा महिला बचत गट, खोडेपुरीच्या अध्यक्षा मोनिका शर्मा यांनी रंग निर्मिती  करून दाखवली. 

जेईइस महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी, केव्हीकेचे अन्न प्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. शशिकांत पाटील उपस्थित होते. गोलापांगरी, धारकल्याण, देवमूर्ती, हिवरा रोषणगाव व जालना येथील महिलांनी प्रशिक्षणात भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com