महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
कृषी प्रक्रिया
बिटापासून बर्फीनिर्मिती
लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे लोह, जीवनसत्त्वे, फोलिक आम्ल आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील अँटिआॅक्सिडंटमुळे (विशेषतः बिटा गीयानीन) शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. याचबरोबर नायट्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडीअम, जीवनसत्त्व ब १ (थायमिन), ब २ (रायबोफ्लेवीन) आणि क (एस्कॉर्बिक आम्ल) हे तत्त्व बिटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.

बद्धकोष्टता आणि त्वचेच्या समस्येवर बीट उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाबदेखील नियंत्रित ठेवते तसेच रक्त शुद्धीकरण करते. बिटाचे उपयोग लक्षात घेता यापासून खाद्यपदार्थ निर्मितीला चांगली संधी आहे.
साखर | ४० ग्रॅ. |
खिसलेले खोबरे | ३० ग्रॅ. |
बीटरूट | २५ ग्रॅ. |
दूध | ५ मि.लि. |
बर्फी तयार करण्याची पद्धत ः
- बीटरूट स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून घ्यावी आणि खिसून घ्यावे.
- खिसलेले बीट, खोबरे, साखर यांचे दुधासोबत मिश्रण तयार करावे.
- मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी गॅसवर गरम करावे. दुसऱ्या बाजूला ट्रेमध्ये तुपाचे लेप लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे जाड थर तयार करून घ्यावा. तयार झालेला थर थंड करून योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.
: सोमनाथ सावळकर, ७३५०३८५००१
(अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, लोदगा, जि. लातूर)