दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस' मुंबईत दाखल !

मालावी हापूस
मालावी हापूस

पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात लागवड केलेला हापूस आंबा मंगळवारी (ता.१२) मुंबईत दाखल झाला. यामुळे कोकण हापूसच्या हंगामाअगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार आहे. लवकरच हा आंबा पुण्यासह राज्य आणि परराज्यांत उपलब्ध होणार आहे. 

वाशी बाजार समितीमधील मुख्य आयातदार संजय पानसरे हे दोन वर्षांपासून मालावी हापूसची आयात करत आहेत. दरम्यान, हा आंबा किलोवर विक्री होत असून, साधारण तीन किलोच्या बॉक्सची किंमत १४०० ते २ हजार रुपये असल्याचे पानसरे यांनी सांगितले. यंदा १५० टन आंबा विक्रीचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. 

सुमारे ७-८ वर्षांपूर्वी एका उद्योगसमूहाने दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात हापूसची सुमारे ६०० हेक्टरवर अतिसधन पद्धतीने लागवड केली आहे. याचे उत्पादन गेल्या वर्षीपासून सुरू झाले असून, गेल्या वर्षी सुमारे १५ टन आंब्याची आयात आणि विक्री केल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले. कोकणातील हापूस सारखाच आकार, रंग आणि चव असून, ग्राहकांचीदेखील मागणी वाढत आहे. तीन किलोच्या बॉक्समध्ये मोठ्या आकाराची साधारण  ९; तर लहान आकाराची सुमारे १६ फळे असतात.

मुंबईसह पुणे, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील हा आंबा पाठविला जातो. गुजरातमधून राजकोट, अहमदाबाद, सुरत, बडोदा, जामनगर येथून मोठी मागणी असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले. साधारण १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याची आवक सुरू राहण्याचा अंदाज आहे.    पुण्यात आजपासून आंबा उपलब्ध  मुंबईनंतर पुणे बाजार समितीमध्ये मालावी हापूस उपलब्ध होणार आहे, असे आंब्याचे प्रमुख अडतदार नाथसाहेब खैरे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com