agriculture news in marathi, malavi alphonso arrival starts, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस' मुंबईत दाखल !

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात लागवड केलेला हापूस आंबा मंगळवारी (ता.१२) मुंबईत दाखल झाला. यामुळे कोकण हापूसच्या हंगामाअगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार आहे. लवकरच हा आंबा पुण्यासह राज्य आणि परराज्यांत उपलब्ध होणार आहे. 

वाशी बाजार समितीमधील मुख्य आयातदार संजय पानसरे हे दोन वर्षांपासून मालावी हापूसची आयात करत आहेत. दरम्यान, हा आंबा किलोवर विक्री होत असून, साधारण तीन किलोच्या बॉक्सची किंमत १४०० ते २ हजार रुपये असल्याचे पानसरे यांनी सांगितले. यंदा १५० टन आंबा विक्रीचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. 

पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात लागवड केलेला हापूस आंबा मंगळवारी (ता.१२) मुंबईत दाखल झाला. यामुळे कोकण हापूसच्या हंगामाअगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार आहे. लवकरच हा आंबा पुण्यासह राज्य आणि परराज्यांत उपलब्ध होणार आहे. 

वाशी बाजार समितीमधील मुख्य आयातदार संजय पानसरे हे दोन वर्षांपासून मालावी हापूसची आयात करत आहेत. दरम्यान, हा आंबा किलोवर विक्री होत असून, साधारण तीन किलोच्या बॉक्सची किंमत १४०० ते २ हजार रुपये असल्याचे पानसरे यांनी सांगितले. यंदा १५० टन आंबा विक्रीचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. 

सुमारे ७-८ वर्षांपूर्वी एका उद्योगसमूहाने दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात हापूसची सुमारे ६०० हेक्टरवर अतिसधन पद्धतीने लागवड केली आहे. याचे उत्पादन गेल्या वर्षीपासून सुरू झाले असून, गेल्या वर्षी सुमारे १५ टन आंब्याची आयात आणि विक्री केल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले. कोकणातील हापूस सारखाच आकार, रंग आणि चव असून, ग्राहकांचीदेखील मागणी वाढत आहे. तीन किलोच्या बॉक्समध्ये मोठ्या आकाराची साधारण  ९; तर लहान आकाराची सुमारे १६ फळे असतात.

मुंबईसह पुणे, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील हा आंबा पाठविला जातो. गुजरातमधून राजकोट, अहमदाबाद, सुरत, बडोदा, जामनगर येथून मोठी मागणी असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले. साधारण १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याची आवक सुरू राहण्याचा अंदाज आहे. 
 
पुण्यात आजपासून आंबा उपलब्ध 
मुंबईनंतर पुणे बाजार समितीमध्ये मालावी हापूस उपलब्ध होणार आहे, असे आंब्याचे प्रमुख अडतदार नाथसाहेब खैरे यांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...