agriculture news in marathi, In Malawi, the hapuse entered the country | Agrowon

मालावी देशातील हापूस पुण्यात दाखल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील हापूस आंबा मुंबईनंतर आता पुण्यात दाखल झाला आहे. या वेळी मालावी हापूसला १८०० ते २००० रुपये प्रतिडझन असा दर मिळाला असून, या आंब्याचा हंगाम आॅक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने असल्याचे ज्येष्ठ अडते नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.

पुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील हापूस आंबा मुंबईनंतर आता पुण्यात दाखल झाला आहे. या वेळी मालावी हापूसला १८०० ते २००० रुपये प्रतिडझन असा दर मिळाला असून, या आंब्याचा हंगाम आॅक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने असल्याचे ज्येष्ठ अडते नाथसाहेब खैरे यांनी सांगितले.

एका खासगी उद्योगाने २०१२ मध्ये दापोली येथून हापूस आंब्याची मातृरोपे नेऊन मालावी येथे सुमारे ७०० हेक्टरवर कलमांची अतिघन पद्धतीने लागवड केली. यानंतर २०१६ मध्ये आंब्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर थोड्या प्रमाणावर आंबा भारतात निर्यात करण्यात आला होता. यानंतर सलग दोन वर्षे मालावी येथून भारतात आंबा निर्यात होत असून, यंदाची निर्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाली आहे. विशेषतः प्रक्रिया उद्योगासाठी आंब्याची लागवड करण्यात आली असून, काही प्रमाणात आंबा युरोप, आखाती देशांसह भारतात पाठविला जातो, अशी माहिती आयातदार निरंजन शर्मा यांनी दिली.

एक डझनच्या बॉक्समध्ये या आंब्याची आवक मुंबई बाजार समितीमधील व्यापारी संजय पानसरे व पुणे बाजार समितीमधील नाथसाहेब खैरे यांच्याकडे झाली. यंदा १० हजार डझन आंबा विक्रीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र कस्टमच्या काही तांत्रिक अडचणींमुळे आंबा येण्यास उशीर झाला. यामुळे यंदा केवळ ५ हजार डझन आंबा विक्री शक्य असल्याचे खैरे यांनी सांगितले.

मालावी हापूसचा आकार कोकण हापूस सारखाच असून, रंग आणि चवदेखील सारखीच असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र दर थोडे जास्त असल्याने विशिष्ट ग्राहकच या आंब्याला आहे. आॅक्टोबरमध्ये आंबा उपलब्ध असल्याचे ग्राहकांपर्यंत पोचल्यास या आंब्याची मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकेल, असेही खैरे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...