श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस आजपासून प्रारंभ

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस आजपासून प्रारंभ
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस आजपासून प्रारंभ

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील खंडोबा यात्रेस शुक्रवारी (ता. ४) प्रारंभ होत आहे. या यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. ४) दुपारी अडीच वाजता होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांठी पीक उत्पादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी ही माहिती दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. जि. प. उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषी आवजारे, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळपिके, अन्नधान्य पिके, मसाला पिके उपलब्ध असणार आहेत. यानिमित्त उत्कृष्ट उत्पादन घेणार शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम बक्षीस ४ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये आणि तृतीय बक्षीस २ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. कीटकनाशकांचा सुरक्षित वापर तसेच शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. पोखर्णी आणि सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे माती परीक्षण करून दिले जाणार आहे. विविध पिकांवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पशू प्रदर्शनाचे आयोजन या यात्रेमध्ये शुक्रवारी (ता. ४ )पशुसंवर्धनविषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्‌घाटन तसेच दुग्धस्पर्धा. शनिवारी (ता. ५)भव्य पशू प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. सोमवारी (ता. ७) बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. पशू प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी ८ ते ११ आहे. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षिसांसोबत प्रशस्‍तिपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. पशुपालकांनी आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यासोबत आणावी, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. शिवाजी पवार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com