श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला उत्साहात प्रारंभ

श्री क्षेत्र माळेगाव यात्रेस प्रारंभ
श्री क्षेत्र माळेगाव यात्रेस प्रारंभ

 माळकोळी, जि.नांदेड (प्रतिनिधी) ः यळकोट...यळकोट...जय मल्हारचा जयघोष, खोबरे आणि परंपरेप्रमाणे भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात श्री खंडेरायाच्या पालखी सोहळ्याने दक्षिण भारतातील सर्वांत मोठी तसेच अनेक समाज घटकांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील यात्रेस शुक्रवारी (ता. ४) प्रारंभ झाला.

शुक्रवारी दुपारी दीड वाजता खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. या वेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, जिल्हाधिकारी अरुण डोंगेरे आदी उपस्थित होते. दुपारी साडेतीन वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. नियोजित मार्गाने पालखी सोहळा शासकीय विश्रामगृह येथे आला असता जिल्हा परिषदेतर्फे मानकऱ्यांच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत आणि पूजन करण्यात आले.

या वेळी पालखीचे मानकरी गणपतराव नाईक (रिसनगाव), नागेश महाजन (कुरुळा), व्यंकटराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव नाईकवाडे (पानभोसी) यांचा परंपरेनुसार मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सभापती शिला निखाते, सभापती मधुमती देशमुख कुंटुरकर, माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, सभापती सतीश उमरेकर, दिलीप धोंडगे, विजय धोंडगे, चंद्रसेन पाटील,प्रणिती चिखलीकर, पुणम पवार, सरपंच गोविंदराव राठोड, बालाजी राठोड, विजयकुमार वाघमारे, केरबा धुळगुंडे आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com