रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक बालविकास’ कुपोषित

Malnourished 'integrated child development' due to vacancies
Malnourished 'integrated child development' due to vacancies

भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण आणि आरोग्य सुस्थितीत सुधारणा करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी ते अंगणवाडी सेविका अशी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. सातारा जिल्ह्यातील या विभागात एकूण १८ प्रकल्प अधिकाऱ्यांपैकी तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर इतर वाढत्या रिक्त पदांमुळे बालविकास प्रकल्प कुपोषित झाल्याचे दिसून येत असल्याने ही पदे भरून हा प्रकल्प सुदृढ करावा, अशी मागणी होत आहे.

बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी, तसेच जन्मल्यानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणानुसारच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविला जात असून, त्याअंतर्गत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, आहार व शिक्षण देण्याचे काम केले जाते; परंतु हा प्रकल्प चालविण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या १८ बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांपैकी ११ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील बालकांचा सर्वांगीण विकास नेमका कसा साधला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गरीब कुटुंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागळापर्यंत पोचलेल्या या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ६८९ बालकांसाठी चार हजार ८१० अंगणवाड्या कार्यरत आहेत. या प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी १८ बालविकास प्रकल्प अधिकारी पदे मंजूर असून, त्यापैकी सात पदे कार्यरत असून, तब्बल ११ पदे रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांची एकूण तीन हजार ९३१ पदे मंजूर असून, त्यापैकी तीन हजार ८०७ पदे कार्यरत असून, त्यातील १२४ पदे रिक्त आहेत. मदतनीसांची एकूण तीन हजार ९३१ मंजूर पदे असून, यातील २५० रिक्त आहेत. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सामान्य प्रशासन विभागाच्या २४ जून १९९३ च्या शासन निर्णयाप्रमाणे महिला व बालकल्याण विभाग निर्माण करण्यात आला. त्याअंतर्गत या प्रकल्पाचे कार्य सुरू करण्यात आले.

रिक्त पदांमुळे सर्वांगीण विकासावर विरजण बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यभार मात्र प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर दिला गेला आहे. यातही अनेक पर्यवेक्षिकेचेही पद रिक्त आहेत. त्यामुळे पर्यवेक्षिकांकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून, प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने आवश्‍यक त्या पद्धतीने अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उद्देश ठेवून सुरू केलेले शासनाच्या कार्यावर मात्र, विरजन पडत असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com