सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला मारहाण; तक्रार दाखल

आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे.
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला मारहाण; तक्रार दाखल
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला मारहाण; तक्रार दाखल

नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून, चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.  सोमवारी (ता. ६) रात्री ९च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय ३५) यांनी कासेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने यांनी कासेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडून होते. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकरी हितावरून टीका केल्याचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला. या वेळी ‘तू सदाभाऊंच्या वर टीका करतोस. तुला मस्ती आली आहे.’ असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी भास्कर विष्णू मोरे व विश्‍वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु चौघांनी धक्काबुक्की करून ढकलून दिले. आरडाओरडा केल्यानंतर ते घरातून बाहेर गेले.  या घटनेची तक्रार कासेगाव पोलिसात दिली आहे. याबाबत कासेगाव पोलिसांत घरात घुसून मारहाण करणे, जाणीव पूर्वक मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com