agriculture news in marathi Man handling case against Sagar Khot | Page 3 ||| Agrowon

सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला मारहाण; तक्रार दाखल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे.

नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी तांबवे (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून, चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. 

सोमवारी (ता. ६) रात्री ९च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय ३५) यांनी कासेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माने यांनी कासेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडून होते. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकरी हितावरून टीका केल्याचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला.

या वेळी ‘तू सदाभाऊंच्या वर टीका करतोस. तुला मस्ती आली आहे.’ असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी भास्कर विष्णू मोरे व विश्‍वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु चौघांनी धक्काबुक्की करून ढकलून दिले. आरडाओरडा केल्यानंतर ते घरातून बाहेर गेले. 

या घटनेची तक्रार कासेगाव पोलिसात दिली आहे. याबाबत कासेगाव पोलिसांत घरात घुसून मारहाण करणे, जाणीव पूर्वक मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...