agriculture news in marathi, Manage income from yearly business: Jankar | Agrowon

शेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची व्यवस्था करा ः जानकर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

नांदेड  ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांची एकत्रित जोड करून वर्षभर रोजगार तसेच उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था गाव पातळीवर करावी. शेतकऱ्यांनी किमान २० गुंठे क्षेत्रावर चारा लागवड करून उत्पादित चाऱ्याची जिल्ह्याची गरज भागवून इतर टंचाईग्रस्त भागास चारापुरवठा करावा. तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत समाविष्ट जिल्ह्यातील पाच तालुक्यांना वगळून इतर तालुक्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मदत करावी, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांनी केल्या.

नांदेड  ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांची एकत्रित जोड करून वर्षभर रोजगार तसेच उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था गाव पातळीवर करावी. शेतकऱ्यांनी किमान २० गुंठे क्षेत्रावर चारा लागवड करून उत्पादित चाऱ्याची जिल्ह्याची गरज भागवून इतर टंचाईग्रस्त भागास चारापुरवठा करावा. तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत समाविष्ट जिल्ह्यातील पाच तालुक्यांना वगळून इतर तालुक्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मदत करावी, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांनी केल्या.

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनल पाटील-खतगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक पी. आर. फडणीस, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नपारखे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा कृषी अधिकारी संतोष नादरे यांची प्रमुख उपस्थिती होती.   

श्री. जानकर म्हणाले, टंचाईग्रस्त भागात कायमस्वरूपी उपाय योजनांसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या वेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करून उपयुक्त सूचना देण्यात आल्या.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...