agriculture news in marathi management of Banana Fusarium Disease | Agrowon

केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापन

डॉ.के.बी.पवार, एस.बी.माने
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. पानांच्या कडा पिवळ्या पडून संपूर्ण पान पिवळे पडते. पाने देठाकडील बाजूने हळूहळू जमिनीच्या दिशेने वाकतात.

झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. पानांच्या कडा पिवळ्या पडून संपूर्ण पान पिवळे पडते. पाने देठाकडील बाजूने हळूहळू जमिनीच्या दिशेने वाकतात. पाने संपूर्ण वाळतात व गळून पडतात. नवीन येणारी पाने चुरगळलेली फिकट रंगाची असतात.

केळी पिकावर आढळणारा ‘मर रोग’ अत्यंत घातक आहे. सर्वत्र त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. हा रोग ‘पनामा’ मर या नावाने देखील ओळखला जातो. या रोगाचा प्रादुर्भाव फ्युजारियम ऑक्झिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे होतो. केळी पिकातील मालभोग, नांगजनगोड रसाबळे, अम्रितपाणी, सिल्क, कानयाळी मोनयन व वीरूपाक्षी हे वाण या रोगास बळी पडतात.

या रोगाच्या बुरशीची जमिनीत तग धरून राहण्याची क्षमता ३० वर्षांपेक्षा जास्त असते. तसेच या बुरशीचे अलैंगिक पद्धतीने असंख्य बीजाणू तयार होतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार थोपवून नियंत्रण करणे कठीण आहे. नियंत्रणाच्या उपायांची कमतरता आणि रोगप्रतिकारक वाणांचा अभाव यामुळे रोगाची तीव्रता अधिक जाणवते. 

रोगाची लक्षणे 

 • लागवडीनंतर ४-५ महिन्यानंतर रोगाची सुरुवात होते. 
 • झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. 
 • पानांच्या कडा पिवळ्या पडून संपूर्ण पान पिवळे पडते. खालून वर या क्रमाने झाडावरील सर्व पाने १ ते ३ आठवड्यात पिवळट होतात. 
 • पाने देठाकडील बाजूने हळूहळू जमिनीच्या दिशेने वाकतात. पाने संपूर्ण वाळतात व गळून पडतात. नवीन येणारी पाने चुरगळलेली फिकट रंगाची असतात.
 • रोगग्रस्त झाडाचे खोड जमिनीलगत उभे चिरले जाते. खोडाच्या आतील भागात लालसर किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. नंतर ते काळपट होतात. 
 • बाहेरील बाजूने चट्टे पडल्याने अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात. परिणामी झाड बुटके राहते आणि मरते.

रोगप्रसार 

 • रोगग्रस्त कंद, संसर्गयुक्त माती, रोगग्रस्त झाडांचे अवशेष, रोगट बागेत वापरलेली अवजारे, रोगग्रस्त बागेत वाहणारे पाणी, बागेत वाढलेली दगडी तसेच दुधाणीसारखी तणे आणि सूत्रकृमी यांच्यामार्फत होतो. 
 • केळीवरील कंद पोखरणारी अळी व सोंडकिडे या रोगाचे वाहक असतात.

अनुकूल बाबी  

 • लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर.
 • केळी पिकाचा वारंवार खोडवा घेणे. रोगास बळी पडणाऱ्या स्थानिक वाणांचा वापर.
 • जमिनीतील कमी आर्द्रता आणि ३० अंश सेल्सिअस तापमान.  पाण्याचा अयोग्य पद्धतीने केलेला निचरा.
 • सुरुवातीस पाण्याचा ताण व त्यानंतर मोठ्या प्रमाणात पडणारा संततधार पाऊस.
 • वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जमिनीत साठलेले पाणी.

नियंत्रणाचे उपाय 

 • शेजारील राज्यातील कंद किंवा उतिसंवर्धित रोपांची लागवड करणे टाळावे. 
 • लागवडीसाठी खात्रीशीर ठिकाण कंद किंवा उतिसंवर्धित रोपे वापरावीत. केळी बागेचे नियोजन करण्यापूर्वी तागाचे हिरवळीचे पीक घ्यावे.
 • लागवडीपूर्वी १० किलो चांगल्या कुजलेल्या शेणाखतामध्ये ट्रायकोडर्मा २० ग्रॅम मिसळून प्रतिझाड या प्रमाणात द्यावे.
 • रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा वापरावी. अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा. बागेतील पाण्याचा निचरा करावा.
 • प्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद, मुनवे वापरू नयेत.
 • प्रतिलिटर पाण्यात कार्बेन्डाझिम २० ग्रॅम मिसळून द्रावण करावे. लागवडीच्या वेळी कंद या द्रावणात ३० ते ४० मिनिटे बुडवून ठेवावेत.
 • बागेस ठिबक सिंचनाद्वारे योग्य प्रमाणात पाणी द्यावे. रोगग्रस्त बागेतील पाणी बाहेर जाऊ देऊ नये. 

सोंडकिडे 

 • लागवडीनंतर ३ व ५ महिन्यांनी प्रतिझाड कार्बेफ्युरॉन ४० ग्रॅम बुंध्याभोवती टाकावे.
 • सूत्रकृमी 
 • ॲझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम) २० मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून ३० मिनिटे कंद प्रक्रिया करावी.
 • सुडोमोनास फ्लोरोसन्स (०.५ टक्का डब्ल्यूपी) (२ बाय १०९ बीजकण प्रति ग्रॅम) हे जिवाणूजन्य कीटकनाशक २० ग्रॅम अधिक निंबोळी पेंड पावडर २५० ग्रॅम यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण प्रति झाड या प्रमाणात खोडाभोवती बांगडी पद्धतीने लागवडीवेळी द्यावे. तिसऱ्या व सहाव्या महिन्यात पुन्हा हीच प्रक्रिया करावी.

(टीप ः लेखातील कीडनाशकांना ॲग्रेस्को शिफारस आहे.)

संपर्क- डॉ.के.बी.पवार, ९८२२४४३६९२
एस.बी.माने, ९८३४९५४८३७
(अखिल भारतीय समन्वित संशोधन  प्रकल्प (केळी), जळगाव.)


इतर फळबाग
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...