डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे व्यवस्थापन

फळ तोडणीनंतर ताणावर असतानाकिंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ड्रेचिंगला प्राधान्य द्या. खालीलपैकी फक्त एक पद्धत वापरा.
Fungal Disease in Pomegranate
Fungal Disease in Pomegranate

फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ड्रेचिंगला प्राधान्य द्या. खालीलपैकी फक्त एक पद्धत वापरा. पहिली पद्धत 

  • प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के) २ मिलि अधिक क्लोरपायरिफॉस २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे १० लिटर द्रावण प्रति झाड ड्रेचिंग करावी. 
  • पहिल्या ड्रेचिंगच्या ३० दिवसांनंतर, अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी ५ ग्रॅम प्रति झाड आणि २ किलो शेणखत. त्यानंतर ३० दिवसांनी व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम प्रति झाड आणि २ किलो शेणखत.
  • दुसरी पद्धत  प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के) २ मिलि + क्लोरपायरिफॉस २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग करा. तिसरी पद्धत 

  • पहिली ड्रेचिंग - फोसेटिल ए एल (८० टक्के डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति झाड   
  • दुसरी ड्रेचिंग - टेब्यूकोनॅझोल (२५.९ टक्के डब्ल्यू / डब्ल्यूईसी) ३ मिलि प्रति झाड 
  • तिसरी ड्रेचिंग - फोसेटिल ए एल (८० टक्के) ६ ग्रॅम प्रति झाड 
  • चौथी ड्रेचिंग - टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के) ३ मिलि प्रति झाड  (१० लिटर द्रावण, २० दिवसांनी) 
  • सर्व बहरांतील रोगनियंत्रणासाठी डाळिंब बुरशीजन्य स्कॅब, स्पॉट्स आणि रॉट्ससाठी काही उपयोगी बुरशीनाशके   (प्रमाण प्रति लिटर पाणी)

  • मॅंडिप्रोपॅमिड (२३.४ टक्के एससी) १ मिलि
  • प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि अधिक ॲझोक्सिस्ट्रॉबिन १ मिलि
  • ॲझोक्सिस्ट्रोबिन (२० टक्के) अधिक  डायफेनोकोनॅझोल (१२.५ टक्के ​​एससी) (संयुक्त बुरशीनाशक) २ मिलि.
  • क्लोरोथॅलोनिल (५० टक्के) अधिक मेटालॅक्झिल एम (३.७५ टक्के)  (संयुक्त बुरशीनाशक)  २ मिली.
  • बोर्डो मिश्रण ०.५ टक्का
  • ट्रायसायक्लोझोल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६२ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २-२.५ ग्रॅम.
  • क्लोरोथॅलोनिल (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम
  • प्रोपिकोनॅझोल १ मिलि
  • क्लोरोथॅलोनिल (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम.
  • संपर्क : दिनकर चौधरी, ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब  संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com