agriculture news in marathi management of flies in the shed of animal | Agrowon

गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. कल्याणी सरप, डॉ. एस. यु. नेमाडे
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

गोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय माश्यांचे प्रमाण वाढते.सध्या सर्वत्र माश्यांचे प्रमाण खूप वाढलेले असते. माश्यांचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर जनावरांचे लक्ष विचलित होते.

गोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय माश्यांचे प्रमाण वाढते.सध्या सर्वत्र माश्यांचे प्रमाण खूप वाढलेले असते. माश्यांचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर जनावरांचे लक्ष विचलित होते. जनावरांच्या खाद्य व खाण्यावर परिणाम होऊन त्यांच्या वजनात घट होते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन शेवटी दुग्धोत्पादनात घट होते. म्हणून गोठ्यातील माश्यांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. 

कीटकवर्गीय माश्यांचे प्रकार 

 • चावणाऱ्या किंवा रक्त शोषणाऱ्या माश्या (गो माशी)
 • चावा न घेणाऱ्या माश्या (घरगुती माशी)

माश्यांचा जीवनक्रम

 • मादी माशी आपल्या उगमस्थानावर, ओलसर ठिकाणी अंडी घालते.गोठ्यातील तापमान आणि आर्द्रतेमध्ये अंड्याची वाढ होऊन अर्भके तयार होतात.
 • अर्भक अवस्था गोठ्यातील घाण साचलेले पाणी,नाली,शेणाच्या ढिगारामध्ये,साचलेल्या पाण्याच्या जागेवर आढळते.ठराविक कालावधीमध्ये अळी कोषावस्थेत जाते. त्यानंतर कोशातून बाहेर पडते.

कीटकवर्गीय माश्यांचे जनावरांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम 

 • रक्त शोषणामुळे रक्तक्षय.
 • शरीरातील आवश्यक घटक मूलद्रव्याचे प्रमाण कमी होऊन शरीर प्रक्रिया मंदावते. 
 • हार्मोन्सचे संतुलन बिघडते. 
 • पशू प्रजनन संस्थेवर परिणाम होऊन प्रजनन क्षमता कमी होते. 
 • वजन घट होणे,शरीरावर ताण येतो. शेवटी प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होतो.

प्रतिबंधात्मक उपाय 

 • सातत्याने गोठ्याची स्वच्छता करावी.
 • गवतपट्टा उन्हाळ्यामध्ये जाळावा. त्यामुळे अंड्यासहित इतर अवस्थांचा नायनाट होतो.
 • कुरण व पिकाखालील जमिनीची अदलाबदल करावी.
 • शेणाच्या ढीगाभोवती स्वच्छता ठेवावी.
 • शेणाचा ढिगारा गोठ्यापासून दूर व झाकलेला असावा. त्यापासून गोठ्याभोवती माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही.
 • मुक्त संचार गोठा पद्धतीचा दुधाळ जनावरांसाठी वापर करावा.
 • माश्यांची उत्पत्ती नाला, घाण पाण्यात होते. त्यामुळे तेथे शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
 • गोठ्या सभोवतालच्या नाली बंदिस्त असाव्यात. नाल्यांचा उतार व्यवस्थित असावा, जेणेकरून तो वाहता राहील. नाला नियमितपणे साफ करावा.
 • गोठ्यातील मलमुत्राची योग्य ती विल्हेवाट लावावी.
 • पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचे खाचखळगे असल्यास त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत.
 • सुधारित पद्धतीच्या गोठ्यामध्ये सूर्योदय, सूर्यास्तावेळी पंखा लावल्यास माश्या चावण्याचे प्रमाण कमी होते.

संपर्क- डॉ. कल्याणी सरप,९०९६८७०५५०
(कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ)


इतर कृषिपूरक
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...
शेळ्या- मेंढ्यांमधील आंत्रविषारमोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही...
शेततळ्यातील मत्स्यपालन झाले उत्पन्नाचे...करडा (जि. वाशीम) येथील कृषी विज्ञान केंद्राने...