व्यवस्थापन दुधाळ जनावरांचे...

गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. सध्या मागणी अभावी अतिरिक्त दूध फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर पशुआहारामध्ये करू शकतो. दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्धांश, खनिजे आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात.
provide proper diet to milch animals
provide proper diet to milch animals

गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. सध्या मागणी अभावी अतिरिक्त दूध फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर पशुआहारामध्ये करू शकतो. दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्धांश, खनिजे आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. कोरोनाबाबतच्या गैरसमजुती आणि अफवांमुळे दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आले आहेत. सध्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे वाहतूक बंद असल्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ यांची मागणी कमी झाली आहे. बऱ्याचशा ठिकाणी अतिरिक्त दूध पाण्यामध्ये सोडून दिले जात आहे. तसेच प्रक्रिया उद्योग सुरू नसल्यामुळे दुग्धजन्य पदार्थ बनवणे शक्य होत नाही. प्रत्यक्षामध्ये चिकन, मटण, अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही. कारण हे सर्व पदार्थ आपण शिजवून, उकडून खातो. या तापमानाला (७५० ते १००० अंश सेल्सिअस) कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही. पशू आहाराचे नियोजन

  • पशुपालनामध्ये आहारावर खर्च जास्त प्रमाणात होतो, तो कमी करणे गरजेचे आहे. हे करताना जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर काही विपरीत परिणाम होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावे.
  • गाई, म्हशींची नैसर्गिक दूध देण्याची क्षमता आणि त्याचा उपयोग करून घेणे हे स्वाभाविक असल्याने दूध न काढणे हे अनैसर्गिक ठरेल. असे जर झाले तर त्या जनावराच्या पुढील वेतामध्ये दूध देण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे पशूपालकांच्यासमोर मागणी अभावी अतिरिक्त दुधाचे काय करायचे हा प्रश्न पडलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी अतिरिक्त दूध फेकून दिले जात आहे, हे योग्य नाही. सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त दुधाचा योग्य वापर करू शकतो.
  • मागणी अभावी अतिरिक्त दूध फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर आपण पशुआहारामध्ये करू शकतो. कारण दुधामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्धांश, खनिजे आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात.
  • दुधामध्ये प्रामुख्याने कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडीयम,क्लोरीन,झिंक, आयर्न,कॉपर,आयोडीन इत्यादी खनिजे तसेच जीवनसत्त्व ड, ब असते. त्यामुळे १० लिटर दूध हे १ ते १.५ किलो पशुखाद्य (सर्वसाधारण गुणवत्ता) म्हणजेच आंबवणाला पौष्टिक तत्वांच्यादृष्टीने बरोबरीचे होवू शकते. म्हणजेच, ५ किलो पशुखाद्यामध्ये जर १ लिटर दूध मिसळले तर सर्वसाधारणपणे १०० ते १५० ग्रॅम पशुखाद्याची बचत होवू शकते. अशा प्रकारे आपण मागणी अभावी अतिरिक्त दुधाचा वापर पशुआहारामध्ये करून दुधाची नासाडी वाचवू शकतो. पशुखाद्याचा खर्च कमी करू शकतो.
  • जनावरांचे व्यवस्थापन

  • पशुखाद्याचा योग्य प्रमाणात वापर
  • खनिज मिश्रणाचा दैनंदिन वापर
  • स्वच्छ व मुबलक पाण्याचा पुरवठा
  • मूरघास, अझोला व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर
  • गोठ्याची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण
  • जैवसुरक्षा
  • उष्माघातावर नियंत्रण
  • संपर्क - डॉ. मनोजकुमार आवारे ९४२१००७७८५ (डॉ. आवारे हे बायफ उरुळी कांचन, पुणे येथे पशुआहार व पशुपोषण विभागाचे प्रमुख आणि डॉ. वर्षा थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशू सूक्ष्मजीवाणू शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com