नीरा कालव्‍याचा कारभार दुय्यम अधिकाऱ्यांवरच

यंदा कडक उन्हाळा जाणवत आहे. विहिरीत आणि विंधन विहिरीत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. नीरा उजवा कालवा सुरू आहे. परंतु त्यावरील अनेक फाटे, उपफाटे अद्यापही सोडले नाहीत.
नीरा कालव्‍याचा कारभार  दुय्यम अधिकाऱ्यांवरच Management of Neera canal Only on secondary officers
नीरा कालव्‍याचा कारभार  दुय्यम अधिकाऱ्यांवरच Management of Neera canal Only on secondary officers

सोलापूर : यंदा कडक उन्हाळा जाणवत आहे. विहिरीत आणि विंधन विहिरीत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. नीरा उजवा कालवा सुरू आहे. परंतु त्यावरील अनेक फाटे, उपफाटे अद्यापही सोडले नाहीत. फाटा क्रमांक ४४ त्वरित सुरू करावा, अशी मागणी  होत आहे. 

पाटबंधारे विभागाच्या अनेक शाखा अधिकारी नसल्याने दुय्यम अधिकारी कारभार करत आहेत. पूर्वी शाखा अभियंता ही जागा भरायला आणि नीरा उजवा आणि नीरा डावा कालव्यावर अधिकारी म्हणून येण्यासाठी वरिष्ठांना आणि राजकीय नेत्यांना लाखो रूपयांची बक्षिसे दिली जात. येथे पोस्टिंग मिळवायला मोठी स्पर्धा लागत होती. आतार्यत कोणीच पदभार स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र आहे. 

आज अशी परिस्थिती आहे की, या ठिकाणी म्हणावी एवढी कमाई नाही. पाण्याची टंचाई आहे. शेतकरी जागृत झाला आहे. वेळेवर पाणी कुठलाही अधिकारी देऊ शकत नाही. त्यामुळे फलटण विभागात अनेक पदे अधिकाऱ्यांअभावी रिक्त आहेत. कोरोनाच्या भितीने व्यापारी शेती मालाची खरेदी माती मोल किमतीला करीत आहेत. अनेक साखर कारखानदारांनी उसाची १०० टक्के बिले दिलेली नाहीत. सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्यांकडे मागील पाच वर्षांचे कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना येणे आहेत. सत्ता बदल झाला तरीही बिले मिळाली नाहीत. उजनी कालव्यातून भोसे फाट्याला पाणी

 उजनी डाव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्याला तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भीमा पाटबंधारे विभागाचे उपमुख्य अभियंता क्षीरसागर यांना भेटून केली होती. त्याची दखल घेण्यात आली असून, भोसे फाट्याला पाणी सोडण्यात आले आहे. 

उजनी डाव्या कालव्यातून सोडण्यात  येत असलेल्या पाण्याचे आवर्तन टेल टू हेड या नियमाप्रमाणे तालुक्याला मिळाले पाहिजे, हे आवर्तन मिळण्यासाठी पंढरपुरातील शेतकऱ्यांना कमीत कमी २० दिवसांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होणार होते, ही बाब लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले. त्यानंतर पाटील यांनी शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन थेट उपमुख्य अभियंता क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर दोनच दिवसांत प्रशासनाने ही मागणी मान्य करीत भोसे फाट्याला पाणी सोडले. दरम्यान, अभिजित पाटील यांच्यामुळे आमच्या या मागणीची दखल घेतली गेल्याचे शेतकरी दत्तात्रय सरडे आणि बाळासाहेब कोरके यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com