Agriculture news in marathi Management of Neera canal Only on secondary officers | Agrowon

नीरा कालव्‍याचा कारभार दुय्यम अधिकाऱ्यांवरच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

यंदा कडक उन्हाळा जाणवत आहे. विहिरीत आणि विंधन विहिरीत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. नीरा उजवा कालवा सुरू आहे. परंतु त्यावरील अनेक फाटे, उपफाटे अद्यापही सोडले नाहीत.

सोलापूर : यंदा कडक उन्हाळा जाणवत आहे. विहिरीत आणि विंधन विहिरीत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. नीरा उजवा कालवा सुरू आहे. परंतु त्यावरील अनेक फाटे, उपफाटे अद्यापही सोडले नाहीत. फाटा क्रमांक ४४ त्वरित सुरू करावा, अशी मागणी 
होत आहे. 

पाटबंधारे विभागाच्या अनेक शाखा अधिकारी नसल्याने दुय्यम अधिकारी कारभार करत आहेत. पूर्वी शाखा अभियंता ही जागा भरायला आणि नीरा उजवा आणि नीरा डावा कालव्यावर अधिकारी म्हणून येण्यासाठी वरिष्ठांना आणि राजकीय नेत्यांना लाखो रूपयांची बक्षिसे दिली जात. येथे पोस्टिंग मिळवायला मोठी स्पर्धा लागत होती. आतार्यत कोणीच पदभार स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र आहे. 

आज अशी परिस्थिती आहे की, या ठिकाणी म्हणावी एवढी कमाई नाही. पाण्याची टंचाई आहे. शेतकरी जागृत झाला आहे. वेळेवर पाणी कुठलाही अधिकारी देऊ शकत नाही. त्यामुळे फलटण विभागात अनेक पदे अधिकाऱ्यांअभावी रिक्त आहेत. कोरोनाच्या भितीने व्यापारी शेती मालाची खरेदी माती मोल किमतीला करीत आहेत. अनेक साखर कारखानदारांनी उसाची १०० टक्के बिले दिलेली नाहीत. सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्यांकडे मागील पाच वर्षांचे कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना येणे आहेत. सत्ता बदल झाला तरीही बिले मिळाली नाहीत.
उजनी कालव्यातून भोसे फाट्याला पाणी

 उजनी डाव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्याला तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भीमा पाटबंधारे विभागाचे उपमुख्य अभियंता क्षीरसागर यांना भेटून केली होती. त्याची दखल घेण्यात आली असून, भोसे फाट्याला पाणी सोडण्यात आले आहे. 

उजनी डाव्या कालव्यातून सोडण्यात 
येत असलेल्या पाण्याचे आवर्तन टेल टू हेड या नियमाप्रमाणे तालुक्याला मिळाले पाहिजे, हे आवर्तन मिळण्यासाठी पंढरपुरातील शेतकऱ्यांना कमीत कमी २० दिवसांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होणार होते, ही बाब लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले. त्यानंतर पाटील यांनी शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन थेट उपमुख्य अभियंता क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर दोनच दिवसांत प्रशासनाने ही मागणी मान्य करीत भोसे फाट्याला पाणी सोडले. दरम्यान, अभिजित पाटील यांच्यामुळे आमच्या या मागणीची दखल घेतली गेल्याचे शेतकरी दत्तात्रय सरडे आणि बाळासाहेब कोरके यांनी सांगितले.
 


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...