गिरणा धरणातून सुटले उन्हाळी आवर्तन

गिरणा पट्ट्यात उष्णतेमुळे वाढती टंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून (ता. चाळीसगाव) बुधवारी (ता. ७) पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. १५०० क्सुसेक वेगाने हे पाणी नदीत सोडले आहे.
गिरणा धरणातून सुटले  उन्हाळी आवर्तन Management of Neera canal Only on secondary officers
गिरणा धरणातून सुटले  उन्हाळी आवर्तन Management of Neera canal Only on secondary officers

जळगाव : गिरणा पट्ट्यात उष्णतेमुळे वाढती टंचाई लक्षात घेता गिरणा धरणातून (ता. चाळीसगाव) बुधवारी (ता. ७) पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. १५०० क्सुसेक वेगाने हे पाणी नदीत सोडले आहे. त्यामुळे सुमारे १२० गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, कूपनलिका, सामूहिक पाणी योजना व विविध शहरांच्या पाणी योजनांच्या स्त्रोतांना आधार होणार आहे. 

नदीत पाणी सोडण्याची मागणी दर महिन्याला केली जाते. कारण नदीत वाळू नसल्याने नदीकाठी पाणी आटताच टंचाई तयार होते. वाळू उपशामुळे नदीत पाणी फारसे जिरत नाही. पाणी वाहून जाते. यामुळे दर महिन्याला नदीकाठच्या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे स्रोत, कूपनलिकांचे पुनर्भरण करण्याची गरज असते.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला म्हणजेच नांदगाव तालुक्यात आहे. परंतु त्याचा लाभ नाशिकमधील मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांना अधिक आहे. या भागात हवा तसा पाऊस होत नाही.

गिरणा धरणाचा मोठा आधार या भागाला आहे. गिरणा नदीत पाणी राहिल्यास टंचाईची तीव्रता कमी होते. ही बाब लक्षात घेऊन नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच कानळतापर्यंत (ता. जळगाव) नदीचे पाणी सोडले जाते. मध्यंतरी दोनदा हे पाणी कानळदा पर्यंत पोचलेच नव्हते. त्यामुळे कानळदा व नजीक टंचाई तयार झाली होती. आता या वेळेस हे पाणी कानळदापर्यंत पोचल्यानंतर किमान दोन दिवस प्रवाही असावे, अशी मागणी केली जात आहे. नदीत पाणी सोडल्याने पाचोरा, भडगाव शहरांच्या पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोतांनाही लाभ होणार आहे.

प्रतिक्रिया गिरणा नदीकाठच्या भागात ग्रामस्थांनी जाऊ नये. नदीत १५०० क्सुसेक वेगाने पाणी सोडले आहे. टंचाई निवारणासाठी हे पाणी नदीत सोडण्यात आले आहे.       - हेमंत पाटील, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com