मनमाड येथील तरुणांचे आमरण उपोषण तूर्तास मागे

मनमाड येथील तरुणांचे आमरण उपोषण तूर्तास मागे
मनमाड येथील तरुणांचे आमरण उपोषण तूर्तास मागे

नाशिक  : मंत्रालयात येत्या ११ तारखेला होणाऱ्या बैठकीत करंजवण योजनेसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. आपण उपोषण थांबवावे असे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले. या केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर गेल्या तीन दिवसांपासून मनमाड शहरातील पाच तरुणांचे सुरू असलेले आमरण उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले.  मनमाड शहरातील नागरिक गेल्या ४० वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी करंजवण ते मनमाड जलवाहिनी योजना शासन दरबारी प्रलंबित आहे. सदर योजना मंजूर करावी या मागणीसाठी तीन दिवसांपासून अमित बाकलीवाल, मनोज गांगुर्डे,  डॉ.अमोल गुजराथी, डॉ. सुहास जाधव, व सतीश न्हायदे या पाच तरुणांनी आमरण उपोषण करत होते. गेल्या तीन दिवसांपासून विविध क्षेत्रातील नागरिक, विविध सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, पुढारी, शहरातील डॉक्टर्स आदीनी उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दिला. या उपोषणाची दखल घेत (ता. ५) खासदार डॉ. भारती पवार यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. अन् त्यांचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला. अखेर खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत या पाचही उपोषण कर्त्यांनी तेजस्विनी निस्ताने या लहान मुलीच्या हस्ते शिरकुरमा देत उपोषणाची सांगता केली.  या वेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, प्रांतधिकारी पाटील, तहसीलदार देशमुख, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, गटनेते गणेश धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, शहराध्यक्ष जय फुलवानी, सचिन दराडे, डॉ. प्रताप गुजराथी, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, सुनील पाटील, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, लियाकत शेख आदी उपस्थित होते. 

...नाहीतर पुन्हा आंदोलन छेडणार ज्या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणास बसलो जर मागणी मंजूर  केली गेली नाही. दिलेला शब्द पळाला नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी या वेळी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com