Agriculture news in Marathi, Manchar market in falling onion prices | Agrowon

मंचरला कांद्याच्या भावात घसरण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

मंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रतिदहा किलोला २५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 

मंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असणारे १० टक्के अनुदान मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रतिदहा किलोला २५ रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 

मंचर बाजार समितीत दर रविवारी, मंगळवारी व गुरुवारी लिलाव पद्धतीने कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार शेतकऱ्यांच्या समक्ष होतात. आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्‍यातील अनेक शेतकरी येथे कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. दरवर्षी सरासरी १४ लाख कांदा पिशव्यांची येथे आवक होते. शेतकऱ्यांनी सोळा हजार कांदा पिशव्या विक्रीसाठी आणल्या होत्या. पण कांद्याची निर्यात करणारे मुंबईचे चारही व्यापारी येथे आले नव्हते. त्यामुळे कांद्याचे खरेदी दर कोसळले, अशी माहिती अडते सागर थोरात यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मंगळवारी दहा किलो कांद्याला १८५ रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारी दहा किलो कांद्याला १६० रुपये बाजारभाव होता.’’ 

दरम्यान, कांद्याचे दर कोसळतील या भीतीपोटी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत आहेत. मंगळवारी दहा हजार कांदा पिशव्यांची आवक झाली होती.

रावसाहेब दानवे यांना भेटणार 
कांद्याला निर्यातीसाठी १० टक्के अनुदान लागू राहील असे केंद्र सरकारने २८ डिसेंबर २०१८ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार ही योजना ३० जूनपर्यंत सुरू राहणार होती. पण त्यापूर्वीच ही योजना अचानक बंद केली. उन्हाळी कांद्याचा स्टॉक शिल्लक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारीही नाराज झाले आहेत. केंद्र सरकारने निर्यातीसाठी दहा टक्के अनुदान पूर्ववत करावे. या मागणीसाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे, असे देवदत्त निकम यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी कांद्याचे दर कोसळू नये व शेतकऱ्यांचा रोष वाढू नये म्हणून निर्यात अनुदान ५ टक्‍क्‍यांवरून १० टक्के केले होते. पण निवडणूक निकालानंतर केंद्र सरकारने अनुदान योजना बंद केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. 
- देवदत्त निकम, सभापती, 
आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...