agriculture news in Marathi, Mandeshi festival will start tomorrow, Maharashtra | Agrowon

मुंबईत उद्यापासून रंगणार माणदेशी महोत्सव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशी भागातील महिला शेतकऱ्यांची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तसेच ग्रामीण संस्कृतीने नटलेला माणदेशी महोत्सव येत्या गुरुवारपासून (ता. ४) मुंबईत होणार आहे. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत हा महोत्सव येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशी भागातील महिला शेतकऱ्यांची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तसेच ग्रामीण संस्कृतीने नटलेला माणदेशी महोत्सव येत्या गुरुवारपासून (ता. ४) मुंबईत होणार आहे. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत हा महोत्सव येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. 

दुष्काळी भागातील महिला सक्षमीकरण आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने याचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहेत. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे. 

या महोत्सवात माणदेशाचे वैशिष्ट्य असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. यावर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत.

त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचे, खर्डा, ठेचा, शेव-पापड आदी विविध बाबी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्सदेखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांनादेखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

तसेच या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार होय. ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचादेखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. माण तालुक्यातील गाझी लोकनृत्य, तसेच एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...