सोलापूर बाजार समितीअंतर्गत मंद्रूपला उपबाजार

सोलापूर बाजार समितीअंतर्गत मंद्रूपला उपबाजार
सोलापूर बाजार समितीअंतर्गत मंद्रूपला उपबाजार

सो लापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेले अतिक्रमण काढणे, ऑइल मिल विभागात घरे करून राहणाऱ्यांवर कारवाईच्या मोहिमेसह मंद्रूपला बाजार समितीअंतर्गत उपबाजार उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी सांगितली.  

माने म्हणाले, "काही तांत्रिक कारणामुळे मंद्रूपच्या बाजाराचा विषय प्रलंबित होता. शिवाय प्रशासकीय कारभारही होता. पण आता या तांत्रिक बाबी संपल्या आहेत. कर्नाटक सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांची सोय म्हणून मंद्रूपच्या बाजाराची आवश्‍यकता आहे. मंद्रूप येथील उपबाजाराचा विषय मासिक सभेत घेतला आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पणन मंडळाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर आवश्‍यक जागेची पाहणी करून त्वरित खरेदी करण्यात येणार आहे. याला अधिक वेळ लागू नये म्हणून आवश्‍यक ती कामे मार्गी लावण्याचे काम करू,''

तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासक म्हणून आलेल्या सुरेश काकडे यांनी लेखापरीक्षण करून गंभीर ताशेरे ओढले होते. त्यातील मुद्द्यांची पडताळणी करून संचालक मंडळाने दोष दुरुस्ती करण्याचा निर्णयही घेतला. गेल्या वर्षीपासून बाजार समितीच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काकडे यांनी बेकायदेशीर ठरविले होते. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले. समितीवर प्रशासक म्हणून शहर उपनिबंधक कुंदन भोळे असताना त्यांनी नोटिसा बजावल्या होत्या. जागा पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा दिला होता. परंतु पुढे काहीच केले नाही. त्याच्यावर पुढील कारवाई आता करण्यात येईल, असेही माने यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com