भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळली

तालुक्यातील भातगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रावर असलेल्या आंबा, काजूची बाग होरपळून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी नुकसानग्रस्त क्षेत्र बागायतींचा पंचनामा करण्यात आला आहे.
Mango and cashew orchards flourished at Bhatgaon
Mango and cashew orchards flourished at Bhatgaon

गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रावर असलेल्या आंबा, काजूची बाग होरपळून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी नुकसानग्रस्त क्षेत्र बागायतींचा पंचनामा करण्यात आला आहे. हातातोंडाशी आलेले आंबा व काजूचे पीक या आगीत भस्मसात झाल्याने बागायतदारांना मोठा धक्का बसला आहे.किमान ६० हजारांचे नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद आहे.

तालुक्यातील भातगाव माळरानावर येथील शेतकऱ्यांनी आंबा व काजूच्या बागायती फुलवल्या आहेत. तसेच या परिसरात मोठया प्रमाणात भातशेतीची लागवडही केली जाते. या भागातील आंबा व काजू पिक चांगले दिसत असताना सुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीज महावितरण कंपनीच्या वीज खांबावर शॉर्ट सर्किट होऊन बागायतींच्या गवताला आग लागली.

कदम यांच्या मालकीच्या बागेत ती सर्वत्र पसरली. सुमारे पाच एकर क्षेत्रावरील आंबा, काजू बागायती होरपळून गेल्या. वणव्यात ७१ गुंठे बागायतीचे नुकसान झाले आहे,असे कदम यानी सांगितले. पंचनाम्यात ६० हजार नुकसान नमूद करण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात नुकसान अधिक आहे.

भातशेतीच्या भाजवळीसाठी आणलेले भारे, चुलीसाठी फोडलेली लाकडे या आगीत जाळून खाक झाली. या आगीत बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com