agriculture news in Marathi mango and cashew producers in treat due to cloudy weather Maharashtra | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंड वारेही वाहत आहे. पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत. 
 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंड वारेही वाहत आहे. पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत. 

जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२७) सायंकाळपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्या सोबतच जोरदार वारे वाहू लागले. विशेष म्हणजे या हवेत गारवा देखील होता. त्यामुळे पाऊस पडण्याची, शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान शनिवार (ता. २८) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वाऱ्याचा वेग ही वाढला आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. 

जिल्ह्यात सध्या आंबा, काजूच्या झाडांना पालवी, मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ला, किनारपट्टीच्या तालुक्यातील अधिकतर आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे हापूसवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काजुला देखील पालवी आणि किरकोळ झाडांना मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण तयार झाल्याने काजूवर कीड रोग वाढण्याची शक्यता आहे.

या पूर्वीच काजूवर ढेकण्या, फांदीमर, या सारख्या कीड रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याने बागायतदार हैराण झाले आहेत.कीड नियत्रंणासाठी विविध कीटकनाशकांच्या फवारण्या करून बागायतदारांनी खडतर प्रयत्नांनी बागांची पालवी आणि मोहोर टिकविला होता. परंतु आता पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट निर्माण झाल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात वाऱ्याचा वेग अधिक आहे. 

ढग, वाहणारे वारे अन् गारठाही 
जिल्ह्यात वातावरणात विचित्र बदल जाणवत आहे. वारा सुटल्यानंतर सर्वत्र थंडीचे प्रमाण कमी होते. परंतु सध्या सोसाट्याचा वारा वाहत असूनही हवेत गारवा ही आहे. अशी स्थिती क्वचितच निर्माण होते. त्यामुळे ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली, असा प्रश्न लोकांना पडला आहे. 

प्रतिक्रिया
अरबी समुद्रात आणि दक्षिणेला समुद्रात निर्माण झालेल्या दोन्ही चक्रीवादळाचा कोणताही धोका कोकण विभागाला नाही. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

- डॉ. यशवंत मुठाळ, ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या, मुळदे, कुडाळ, 


इतर अॅग्रो विशेष
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...