agriculture news in Marathi mango and cashew trees on fire Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग: भटवाडी येथे वणव्यात आंबा, काजू खाक 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

 जिल्ह्यातील आंबेगाव (ता. सांवतवाडी) भटवाडी येथे जंगलात लागलेल्या आगीत माधवी एकनाथ नाईक यांची आंबा, काजू आणि बांबूची दोनशेहून अधिक झाडे जळाली. 

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आंबेगाव (ता. सांवतवाडी) भटवाडी येथे जंगलात लागलेल्या आगीत माधवी एकनाथ नाईक यांची आंबा, काजू आणि बांबूची दोनशेहून अधिक झाडे जळाली. त्यांचे सुमारे तीन लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

माधवी नाईक यांची आंबेगाव भटवाडी येथे आंबा, काजूची बाग आहे. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची बाग असलेल्या जंगलाला आग लागली. मोठ्या प्रमाणात असलेले गवत आणि कडक उन्हाळा यामुळे आगीचा भडका उडाला.

ही आग नाईक यांच्या आंबा, काजू बागेमध्ये घुसली. बागेला आग लागल्याचे समजताच नाईक यांनी आजूबाजूच्या लोकांना घेवुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत बागेतील बहुतांशी झाडे खाक झाली.

उत्पादनक्षम काजूची दीडशे तर आंब्याची ५० झाडे पूर्णपणे जळाली. याशिवाय बांबुचीही बेटे देखील भस्मसात झाली त्यांचे सुमारे तीन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. 

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर गेल्या काही दिवसांत बागांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वणव्यांमध्ये जळलेल्या बागांना नुकसान भरपाई देखील मिळत नाही. त्यामुळे या वणव्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
बारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...
सेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...
उजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...
लातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
उच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...
अकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...
निर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...
नांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...
परभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...
नाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक  : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...
लातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...
अन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
बहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
प्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...
समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...