agriculture news in marathi, mango arrival increase, kolhapur, maharashtra | Agrowon

पावसाच्या शक्‍यतेने कोल्हापुरात आंब्याची आवक वाढली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
पावसाच्या शक्‍यतेमुळे कोकणासह कर्नाटकातून आंब्याची आवक एकदम वाढल्याने दरात घसरण झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत आंब्यांची आवक वाढण्याची शक्‍यता आहे. 
- नईम बागवान, अध्यक्ष, फ्रूट मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर.
कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून आंब्याची आवक वाढली आहे. पूर्वमोसमी पाऊस होऊन आंब्यांचे नुकसान होईल या शक्‍यतेने कोकणातील बागायतदार जादा प्रमाणात आंबा येथील बाजार समितीत पाठवत आहेत. दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक बाजार समितीत होत आहे. 
 
यंदा आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. यामुळे मे महिना उजाडला तरी आंब्यांच्या आवकेत फारशी वाढ होत नव्हती. दराचा अंदाज घेऊन थोड्या थोड्या प्रमाणात आंब्यांची आवक होत होती; परंतु आठ दिवसांपूर्वी कोकणासह अन्य ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाची शक्‍यता निर्माण झाल्याने बागायतदारांनी झाडावरील आंबे उतरवून तातडीने ते बाजारपेठेत पाठविण्यास प्राधान्य दिले.
 
एखादा जोराचा पाऊस झाल्यास सर्वच आंब्याचे नुकसान होऊ नये यासाठी बागायतदारांनी आंबे कोल्हापूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढल्याची माहिती फळ विभागाच्या सूत्रांनी दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांबरोबर बेळगाव, बेंगळूर येथूनही हापूस आंब्यांची जोरदार आवक सुरू झाल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत.
 
कोल्हापूर बाजार समितीत गुरुवारी (ता. १०) देवगड हापूस आंब्यास डझनास १०० ते ४०० रुपये, पायरीस १०० ते २५० रुपये, कर्नाटक हापूसला १०० ते २०० रुपये, तर कर्नाटक पायरीस ५० ते १५० रुपये दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...