agriculture news in Marathi mango arrival in Mumbai APMC Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीत आंब्याची आवक वाढली; दरातही सुधारणा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

टाळेबंदीमुळे दररोज आंब्याच्या केवळ शंभर गाड्या घाऊक फळ बाजारात आणण्याची परवानगी बाजार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे.

मुंबई: टाळेबंदीमुळे दररोज आंब्याच्या केवळ शंभर गाड्या घाऊक फळ बाजारात आणण्याची परवानगी बाजार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे, मात्र आंब्याची मागणी आणि आवक मोठी असल्याने बाजाराबाहेर आंब्याच्या थेट गाड्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच व्यापाऱ्यांच्या गोदामांतही आंब्याची रवानगी केली जात आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली आहे, तर दरात मागच्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. 

घाऊक बाजारात गर्दी टाळण्यासाठी गाड्यांच्या आवकीवर मर्यादा आली आहे. त्यातल्या त्यात आंब्याच्या सर्वाधिक गाड्या बाजारात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज शंभर गाड्या येत आहेत, मात्र हा मुख्य हंगाम असल्याने बाजारात सरासरी २५० ते ३०० गाड्या हापूसची आवक बाजारात होत असते. लॉकडाऊनमुळे इतके दिवस आंबा बाजारात पोहोचू शकत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचबरोबर आंबा खव्वयांची पण निराशा झाली.

आता आंबा बाजारात पोहोचू लागल्यापासून हापूसला मागणी वाढली आहे. त्यापाठोपाठ दरही वाढले आहेत. मागच्या आठवड्यापर्यंत उत्तम दर्जाचा हापूस आंबा २०० ते ३०० रुपये डझनपर्यंत होता. आता तो ५०० ते ६०० रुपये डझनपर्यंत आला आहे, अशी माहिती व्यापारी विजय बेंडे यांनी दिली. मागणीत वाढ झाल्याने हे दर वाढले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. 

तोंडावर अक्षय तृतीया असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ होत आहे. बाजारात आलेला आंबा पिकायला तीन दिवस जातात. त्यानुसार आता बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. बाजारात आंब्याच्या गाड्यांच्या आवकीवर मर्यादा असल्याने थेट काही व्यापाऱ्यांच्या गोदामात आंब्याच्या गाड्या रिकामी होत आहेत. त्यामुळे बाजारात आंबा मुबलक प्रमाणात आहे. कमतरता भासणार नाही, असेही व्यापारी सांगत आहेत. 

वाशीतील घाऊक बाजार समितीमधील पाचही बाजारांमध्ये खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. मात्र, सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी बाजारात काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे बाजारातील गर्दी कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजार सुरू ठेवले आहेत. मात्र, मागच्या काही दिवसांपासून बाजारातील गर्दी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे चित्र आहे. 

अन्नधान्य बाजार, मसाला बाजाराबरोबर सर्वांत जास्त गर्दी असलेल्या भाजीपाला बाजाराबरोबर फळ आणि कांदा, बटाटा बाजारातही ग्राहकांची संख्या रोडावली आहे. अनेक व्यापारी भीतीपोटी अजूनही बाजारात व्यापार करायला येत नसल्याची परिस्थिती बाजारात आहे. परिणामी येथील वाहनाची वर्दळही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात आता शुकशुकाट आहे. 

बाजारात शुकशुकाट 
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून बाजार समितीने आणि सरकारनेही पुढाकार घेऊन घाऊक बाजार समित्या सुरू ठेवल्या आहेत. त्यानुसार आता नवी मुंबईतील पाचही घाऊक बाजार सुरळीत सुरु आहेत. मात्र, बाजारातील गर्दी ओसरली आहे. त्यामुळे सर्वच बाजारांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बाजारातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होऊ लागला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...