agriculture news in marathi, Mango in Aurangabad 4 thousand to 10 thousand rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 मे 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ४) आंब्यांची १४० क्‍विंटल आवक झाली. यामध्ये इतर राज्यांतून येणाऱ्या केसरसह लालबाग, पायरी, बदाम आदी आंब्यांचा समावेश होता. या आंब्याला ४००० ते १०००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ४) आंब्यांची १४० क्‍विंटल आवक झाली. यामध्ये इतर राज्यांतून येणाऱ्या केसरसह लालबाग, पायरी, बदाम आदी आंब्यांचा समावेश होता. या आंब्याला ४००० ते १०००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी मोसंबीची ३१ क्‍विंटल आवक झाली. तिला ६०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३५०० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० क्‍विंटल आवक झालेल्या पपईला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टरबुजाची आवक १९० क्‍विंटल, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल, खरबुजाची आवक १७५ क्‍विंटल, तर दर ८०० ते १५०० रुपये, अंजिराची आवक १८ क्‍विंटल, तर दर ५००० ते ७००० रुपये  प्रतिक्‍विंटल राहिला. ३५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीच्या भाजीला ८०० ते १५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 

पालकाची ५५०० जुड्यांची आवक झाली. त्यास ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २७० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५६८ क्‍विंटल, तर दर ३०० ते १००० रुपये, टोमॅटोची आवक २७६ क्‍विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये, वांग्याची ३३ क्‍विंटल आवक, तर दर ८०० ते १३०० रुपये, गवारीची आवक ३० क्‍विंटल, तर दर १५०० ते ३५०० रुपये, भेंडीची ५२ क्‍विंटल आवक, तर दर १५०० ते ३५०० रुपये, वालशेंगांची आवक ३ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १० क्‍विंटल आवक झालेल्या मकाला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

काकडीची आवक १०८ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये, लिंबांची आवक १० क्‍विंटल, तर दर २५०० ते ६५०० रुपये, कारल्याची आवक ६ क्‍विंटल, तर दर ४००० ते ६००० रुपये, दुधी भोपळ्याची आवक ३ क्‍विंटल, तर दर ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. १४४ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...