औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते ४००० रुपये दर

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे सरासरी दर थोडे सुधारले आहेत. आठवडाभरात जवळपास ९६३ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांना सरासरी २४५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
Mango average in Aurangabad Rates of Rs. 2450 to 4000
Mango average in Aurangabad Rates of Rs. 2450 to 4000

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे सरासरी दर थोडे सुधारले आहेत. आठवडाभरात जवळपास ९६३ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांना सरासरी २४५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ मे रोजी १७७ क्विंटल आवक झालेल्या आंब्यांचे सरासरी दर ३५०० रुपये राहिले. १ जूनला २५० क्विंटल आवक झालेल्या आंब्यांना सरासरी २४५० रुपये दर मिळाला. २ जूनला आंब्यांची आवक १५३ क्विंटल, तर सरासरी दर २ हजार ९५० रुपये होता. ३ जून रोजी २१४ क्विंटल आवक, सरासरी दर ४ हजार रुपये, ५ जून रोजी १६९ क्विंटल आवक, सरासरी दर ४ हजार रुपये होता.

डाळिंबांची आवक कमी राहिली. आठवडाभरात जवळपास ६१ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांना सरासरी २४०३ ते ३२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आठवडाभरात मोसंबीची केवळ २० क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ४ हजार ८५० ते ८ हजार रुपये दर मिळाला. लिंबांची आवक ९२ क्‍विंटल झाली. त्यांना सरासरी ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

जांभळांची आवक सुरू

गत आठवडाभरात केवळ एक वेळ जांभळांची आवक झाली. ५ जून रोजी २४ क्विंटल आवक झालेल्या या जांभळांना ७००० हजार ते १५ हजार रुपये, तर सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com