सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा कॅनिंगला सुरुवात, कोरोनामुळे विलंब

कोरोनासह विविध संकटावर मात करीत जिल्ह्यातील आंबा कॅनिंगला सुरुवात झाली आहे.दरवर्षीपेक्षा कॅनिंग हंगाम दहा ते पधंरा दिवस विलंबाने होत आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला आता निव्वळ पंधरा ते वीस दिवस मिळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा कॅनिंगला सुरुवात, कोरोनामुळे विलंब
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा कॅनिंगला सुरुवात, कोरोनामुळे विलंब

सिंधुदुर्ग ः कोरोनासह विविध संकटावर मात करीत जिल्ह्यातील आंबा कॅनिंगला सुरुवात झाली आहे.दरवर्षीपेक्षा कॅनिंग हंगाम दहा ते पधंरा दिवस विलंबाने होत आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला आता निव्वळ पंधरा ते वीस दिवस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक आंबा हंगाम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला. त्यानंतर कोरोनाचे संकट देशावर ओढवले. सुरुवातीला वाहतूक बंद असल्यामुळे बागायतदार धास्तावले होते. परंतु त्यानंतर आंबा वाहतुकीला पास देण्यात आले. त्यामुळे आंबा राज्याच्या विविध भागात आंबा जाऊ लागला. इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याला बसलेला चाप आणि बागायतदारांनी थेट विक्रीला दिलेले प्राधान्य यामुळे आंब्याला चांगला दर मिळू लागला. त्यामुळे बागायतदारांचा कल थेट आंबा विक्रीकडे राहिला. त्यामुळे दरवर्षी २० एप्रिलपासून सुरू होणारे आंबा कॅनिंग हंगाम यावर्षी अजून सुरू झाला नव्हता. मात्र, मंगळवारी (ता. ५) पासून आंबा कॅनिंगला सुरुवात झाली आहे. प्रतिकिलो २० रूपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. यावर्षी हा हंगाम तब्बल पंधरा ते वीस विलबांने होत असल्यामुळे कॅनिंग व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसच या व्यवसायाला मिळण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com