रत्नागिरी : आंबा, काजू पीकविमा खात्यात जमा होणास सुरुवात

वातावरणातील बदलामुळे मागील हंगामात आंबा, काजू पिकाचे उत्पादन ५० टक्केच आले होते. त्यांना विमा कंपनीने आंब्यासाठी १८ हजार १५८ बागायतदार यांना ८४ कोटी ३३ लाख तर ३७१ काजू बागायतदारांना ३८ लाख ३२ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे.
Mango, Cashew crop insurance starts accumulating in the account
Mango, Cashew crop insurance starts accumulating in the account

रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे मागील हंगामात आंबा, काजू पिकाचे उत्पादन ५० टक्केच आले होते. त्यांना विमा कंपनीने दिलासा दिला आहे. आंब्यासाठी १८ हजार १५८ बागायतदार यांना ८४ कोटी ३३ लाख तर ३७१ काजू बागायतदारांना ३८ लाख ३२ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या खात्यात थेट जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

फळधारणा होणाऱ्या या फळपीक झाडांच्या हवामानावर आधारीत विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची पूर्णतः झळ बसून नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील प्रामुख्याने आंबा, काजू या मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या हंगामी नगदी फळपिकांसाठी विशेषतः तयार केलेली आहे. त्यामध्ये गतवर्षी २०१९ - २०२० या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या अंतर्गत विमा उतरविलेला आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांसाठी फलधारणेच्या कालावधीत पाऊस, कमी -जास्त तापमान वेगाचे वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षणातून परतावा रूपाने आर्थिक साहाय्य मिळते. रत्नागिरी विभागासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली होती.

जिल्ह्यातील महसूल व कृषी मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार ही योजना राबवली गेली. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये हवामानामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची हानी टाळण्यासाठी विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. परंतु गतवर्षीचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. गतवर्षी जानेवारी अखेरीस मोठी तापमान घट झाली होती. तसेच मे मध्ये बहुतांश ठिकाणी अवेळी पाऊस झाला. निकषानुसार जानेवारी अखेरीस कमी तापमान होते. तसेच  मार्च तापमानात वाढ झाली होती. या हवामानाच्या बदलामुळे आंबा, काजू या पिकांच्या फलधारणेवर व परिपक्वतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना परताव्याचा लाभ मिळेल, असा अंदाज होता. त्यात कोरोनामुळे सुरुवातीला विक्री यंत्रणा कोलमडण्याची भीती होती. कालांतराने हा प्रश्न सुटला आणि आंबा व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.

काजूसाठी २७४० शेतकऱ्यांनी भरला विमा काजूसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २७४० शेतकऱ्यांनी २२५९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता. त्यापोटी ९६ लाख ४ हजार प्रिमिअम भरला होता. त्यातील ३७१ शेतकऱ्यांना ३८ लाख २२ हजार रुपये विमा परतावा मिळणार आहे.

१४ हजार हेक्टरवरील आंब्याचा विमा भरणा आंब्यासाठी १८ हजार १५८ शेतकऱ्यांनी १४ हजार ७५५ हेक्टर वरील विमा उतरवला होता. त्यापोटी ८ कोटी ९२ लाख रुपये प्रीमियम भरला होता. विमा परताव्या पोटी सगळ्या आंबा बागायतदारांना भरपाई मिळणार आहे. एकूण ८४ कोटी ३३ लाख रुपये मिळणार आहेत. वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसानीमुळे आंबा बागायतदार त्रस्त होते. त्यांना विमा परताव्याचा लाभ उपयुक्त ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com