Agriculture news in Marathi Mango, Cashew crop insurance starts accumulating in the account | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी : आंबा, काजू पीकविमा खात्यात जमा होणास सुरुवात

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

वातावरणातील बदलामुळे मागील हंगामात आंबा, काजू पिकाचे उत्पादन ५० टक्केच आले होते. त्यांना विमा कंपनीने आंब्यासाठी १८ हजार १५८ बागायतदार यांना ८४ कोटी ३३ लाख तर ३७१ काजू बागायतदारांना ३८ लाख ३२ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे.

रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे मागील हंगामात आंबा, काजू पिकाचे उत्पादन ५० टक्केच आले होते. त्यांना विमा कंपनीने दिलासा दिला आहे. आंब्यासाठी १८ हजार १५८ बागायतदार यांना ८४ कोटी ३३ लाख तर ३७१ काजू बागायतदारांना ३८ लाख ३२ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या खात्यात थेट जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

फळधारणा होणाऱ्या या फळपीक झाडांच्या हवामानावर आधारीत विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची पूर्णतः झळ बसून नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील प्रामुख्याने आंबा, काजू या मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या हंगामी नगदी फळपिकांसाठी विशेषतः तयार केलेली आहे. त्यामध्ये गतवर्षी २०१९ - २०२० या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या अंतर्गत विमा उतरविलेला आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांसाठी फलधारणेच्या कालावधीत पाऊस, कमी -जास्त तापमान वेगाचे वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षणातून परतावा रूपाने आर्थिक साहाय्य मिळते. रत्नागिरी विभागासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली होती.

जिल्ह्यातील महसूल व कृषी मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार ही योजना राबवली गेली. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये हवामानामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची हानी टाळण्यासाठी विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. परंतु गतवर्षीचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. गतवर्षी जानेवारी अखेरीस मोठी तापमान घट झाली होती. तसेच मे मध्ये बहुतांश ठिकाणी अवेळी पाऊस झाला. निकषानुसार जानेवारी अखेरीस कमी तापमान होते. तसेच  मार्च तापमानात वाढ झाली होती. या हवामानाच्या बदलामुळे आंबा, काजू या पिकांच्या फलधारणेवर व परिपक्वतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना परताव्याचा लाभ मिळेल, असा अंदाज होता. त्यात कोरोनामुळे सुरुवातीला विक्री यंत्रणा कोलमडण्याची भीती होती. कालांतराने हा प्रश्न सुटला आणि आंबा व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.

काजूसाठी २७४० शेतकऱ्यांनी भरला विमा
काजूसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २७४० शेतकऱ्यांनी २२५९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता. त्यापोटी ९६ लाख ४ हजार प्रिमिअम भरला होता. त्यातील ३७१ शेतकऱ्यांना ३८ लाख २२ हजार रुपये विमा परतावा मिळणार आहे.

१४ हजार हेक्टरवरील आंब्याचा विमा भरणा
आंब्यासाठी १८ हजार १५८ शेतकऱ्यांनी १४ हजार ७५५ हेक्टर वरील विमा उतरवला होता. त्यापोटी ८ कोटी ९२ लाख रुपये प्रीमियम भरला होता. विमा परताव्या पोटी सगळ्या आंबा बागायतदारांना भरपाई मिळणार आहे. एकूण ८४ कोटी ३३ लाख रुपये मिळणार आहेत. वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसानीमुळे आंबा बागायतदार त्रस्त होते. त्यांना विमा परताव्याचा लाभ उपयुक्त ठरणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...