आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर 

काजूला प्रतिहेक्टरी १३ हजार ते ६१ हजार रुपयांपर्यंत फळपीक विमा परतावा मिळणार आहे. आंब्याला १२ हजार २०० ते ८३ हजार ९०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्याला परताव्यापोटी ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत.
आंबा, काजू विमा परतावा  मंडलनिहाय जाहीर  Mango, cashew insurance refund Circle wise announcement
आंबा, काजू विमा परतावा  मंडलनिहाय जाहीर  Mango, cashew insurance refund Circle wise announcement

सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा मंडलनिहाय जाहीर करण्यात आला आहे. काजूला प्रतिहेक्टरी १३ हजार ते ६१ हजार रुपयांपर्यंत परतावा मिळणार आहे. आंब्याला १२ हजार २०० ते ८३ हजार ९०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्याला परताव्यापोटी ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत.  या वर्षी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तापमान वाढ, अशा अनेक संकटाना आंबा, काजू बागायतदारांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेच्या परतावा नक्की कधी आणि किती मिळणार या बाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी विविध मार्गाने पाठपुरावा करीत होते. परंतु आता विमा कंपनीने जिल्ह्यातील मंडलनिहाय परतावा जाहीर केला आहे. काजूकरिता कमीत कमी हेक्टरी १३ हजार रुपये तर जास्तीत ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत, तर आंबा पिकांसाठी प्रतिहेक्टरी १२ हजार २०० तर जास्तीत ८३ हजार ९०० रूपये जाहीर करण्यात आले आहेत.  सर्वात कमी परतावा देवगड तालुक्यातील देवगड मंडल आणि पडेल मंडलाला १२ हजार २०० रुपये जाहीर झाला आहे. सर्वात जास्त परतावा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा मंडलाला ८३ हजार ९०० रुपये जाहीर झाला आहे. काजूचा सर्वात कमी परतावा कणकवली तालुक्यातील तळेरे आणि कुडाळ तालुक्यातील कुडाळ मंडलाला प्रति हेक्टरी १३ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक परतावा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा मंडलाला प्रति हेक्टरी ६१ हजार रुपये जाहीर झाला आहे. 

मंडलनिहाय जाहीर झालेला परतवा : बापार्डे-३० हजार ५००, देवगड-१२ हजार २००, मिठबांब-१९ हजार, पडेल-१२ हजार २००, पाटगाव-४८ हजार ४००, शिरगाव-४८ हजार ४००, (ता. देवगड) भेडशी- ४८ हजार ४००, तळकट-४८ हजार ४००(ता. दोडामार्ग) फोंडा-६७ हजार ४००, कणकवली-८१ हजार ३८०, नांदगाव-६७ हजार ४००, सांगवे-७७ हजार ८०, तळेरे-५९ हजार ८५०, वागदे-७७ हजार ८० (ता. कणकवली) कडावल-६७ हजार ४००, कसाल-७७ हजार ८०, कुडाळ-५८ हजार ८५०, माणगाव-६७ हजार ४००, पिंगुळी-६७ हजार ४००, वालावल-५३ हजार ८०, आंबेरी-४० हजार ८८०, (ता. कुडाळ) आचरा-५३ हजार ८०, मालवण-१९ हजार, मसुरे-७७ हजार ८०, श्रावण-७७ हजार ८०, (ता.मालवण) आजगाव- ४३ हजार ४००, आंबोली-३१ हजार ८३०, बांदा-५८ हजार ८५०, मडुरा-६७ हजार ४००, सावंतवाडी-६७ हजार ४००, (ता.सावंतवाडी) भुईबावडा ८३ हजार ९००, वैभववाडी- ५२ हजार ७००, एडगाव- ४८ हजार ४००, (ता. वैभववाडी)म्हापण-१९ हजार, शिरोडा-४९ हजार ५००, वेंगुर्ला-१९ हजार, वेतोरे-६७ हजार ४००.  प्रतिक्रिया  विमा कंपनीने मंडलनिहाय जाहीर केलेल्या परताव्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. ही रक्कम प्राप्त होताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.  - सतिश सावंत, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com