Agriculture News in Marathi Mango, cashew insurance refund Circle wise announcement | Page 2 ||| Agrowon

आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

 काजूला प्रतिहेक्टरी १३ हजार ते ६१ हजार रुपयांपर्यंत फळपीक विमा परतावा मिळणार आहे. आंब्याला १२ हजार २०० ते ८३ हजार ९०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्याला परताव्यापोटी ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. 

सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा मंडलनिहाय जाहीर करण्यात आला आहे. काजूला प्रतिहेक्टरी १३ हजार ते ६१ हजार रुपयांपर्यंत परतावा मिळणार आहे. आंब्याला १२ हजार २०० ते ८३ हजार ९०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्याला परताव्यापोटी ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. 

या वर्षी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, तापमान वाढ, अशा अनेक संकटाना आंबा, काजू बागायतदारांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेच्या परतावा नक्की कधी आणि किती मिळणार या बाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी विविध मार्गाने पाठपुरावा करीत होते. परंतु आता विमा कंपनीने जिल्ह्यातील मंडलनिहाय परतावा जाहीर केला आहे. काजूकरिता कमीत कमी हेक्टरी १३ हजार रुपये तर जास्तीत ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत, तर आंबा पिकांसाठी प्रतिहेक्टरी १२ हजार २०० तर जास्तीत ८३ हजार ९०० रूपये जाहीर करण्यात आले आहेत. 

सर्वात कमी परतावा देवगड तालुक्यातील देवगड मंडल आणि पडेल मंडलाला १२ हजार २०० रुपये जाहीर झाला आहे. सर्वात जास्त परतावा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा मंडलाला ८३ हजार ९०० रुपये जाहीर झाला आहे. काजूचा सर्वात कमी परतावा कणकवली तालुक्यातील तळेरे आणि कुडाळ तालुक्यातील कुडाळ मंडलाला प्रति हेक्टरी १३ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक परतावा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा मंडलाला प्रति हेक्टरी ६१ हजार रुपये जाहीर झाला आहे. 

मंडलनिहाय जाहीर झालेला परतवा : बापार्डे-३० हजार ५००, देवगड-१२ हजार २००, मिठबांब-१९ हजार, पडेल-१२ हजार २००, पाटगाव-४८ हजार ४००, शिरगाव-४८ हजार ४००, (ता. देवगड) भेडशी- ४८ हजार ४००, तळकट-४८ हजार ४००(ता. दोडामार्ग) फोंडा-६७ हजार ४००, कणकवली-८१ हजार ३८०, नांदगाव-६७ हजार ४००, सांगवे-७७ हजार ८०, तळेरे-५९ हजार ८५०, वागदे-७७ हजार ८० (ता. कणकवली) कडावल-६७ हजार ४००, कसाल-७७ हजार ८०, कुडाळ-५८ हजार ८५०, माणगाव-६७ हजार ४००, पिंगुळी-६७ हजार ४००, वालावल-५३ हजार ८०, आंबेरी-४० हजार ८८०, (ता. कुडाळ) आचरा-५३ हजार ८०, मालवण-१९ हजार, मसुरे-७७ हजार ८०, श्रावण-७७ हजार ८०, (ता.मालवण) आजगाव- ४३ हजार ४००, आंबोली-३१ हजार ८३०, बांदा-५८ हजार ८५०, मडुरा-६७ हजार ४००, सावंतवाडी-६७ हजार ४००, (ता.सावंतवाडी) भुईबावडा ८३ हजार ९००, वैभववाडी- ५२ हजार ७००, एडगाव- ४८ हजार ४००, (ता. वैभववाडी)म्हापण-१९ हजार, शिरोडा-४९ हजार ५००, वेंगुर्ला-१९ हजार, वेतोरे-६७ हजार ४००. 

प्रतिक्रिया 
विमा कंपनीने मंडलनिहाय जाहीर केलेल्या परताव्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१ कोटी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. ही रक्कम प्राप्त होताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. 
- सतिश सावंत, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...