Agriculture news in Marathi Mango, cashew insurance return Rs 53 crore sanctioned | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३ कोटी मंजूर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना विमा परताव्याचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बागायतदारांसाठी ५३ कोटी ३५ लाख ९० हजार ७१८ रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे.

रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना विमा परताव्याचा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बागायतदारांसाठी ५३ कोटी ३५ लाख ९० हजार ७१८ रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे. १४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावरील बागांचा विमा उतरवण्यात आला होता; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी परतावा मंजूर झाला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रामुख्याने आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगवान वारे आणि गारपीट यामुळे फळ पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. सर्वाधिक फटका किनारी भागातील बागांना बसलेला आहे. यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा योजना लागू करण्यात आला आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केले जातात. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील २४ हजार ६४४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यातील २१ हजार ३५१ आंबा आणि ३ हजार २९३ काजू बागायतदार आहेत. त्यात आंब्यासाठी ५० कोटी ७६ लाख रुपये, तर काजूचे २ कोटी ५९ लाखाचा परतावा आहे. गतवर्षी जिल्ह्याला विक्रमी ८४ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला होता. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या हप्ता वाढूनही परतावा तुलनेत पन्नास टक्केच मिळाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत विमा उतरवण्याचा कालावधी होता. जानेवारीपासून होणाऱ्या बदलांवर आधारित विमा रक्कम दिली जाणार आहे. सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हंगामा केला. अचानक आलेल्या पावसामुळे फळगळ झाली होती.

तौक्तेच्या नुकसानीचे काय?
मे महिन्याच्या तिसऱ्या टप्प्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. परंतु विमा कालावधी १५ मे रोजी संपुष्टात आला आणि दुसऱ्या दिवशी वादळ धडकले. या कालावधीत मोठे नुकसान झाले होते, पण कालावधी संपल्याने त्याचा समावेश परताव्यात नाही.

रकमेची प्रतीक्षाच
कालावधी संपल्यानंतर चार महिने झाले तरीही विमा परतावा मिळालेला नाही. सध्या विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाकडून हप्त्यापोटीची रक्कम विमा कंपनीकडे जमा केलेली नसल्यामुळे प्रत्यक्ष परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कालावधी लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...