agriculture news in Marathi, mango crop in treat of smoke, Maharashtra | Agrowon

कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यात
राजकुमार चौगुले
बुधवार, 20 मार्च 2019

कोकणातील काही भागांत धुक्याचे प्रमाण वाढत आहे, असे हवामान सातत्याने राहिल्यास याचा फटका हंगामाला बसू शकतो. येणाऱ्या आंब्यावर डाग पडून तो खराब होऊ शकतो. उत्पादकांनी वेळीच काळजी घ्यावी. 
- डॉ. एम. बी. दळवी, शास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग
 

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील अनेक भागांत पडणारे धुके आंबा उत्पादकांची डोकेदुखी वाढवणारे ठरत आहे. धुक्यात सातत्य राहिल्यास वाढीच्या अवस्थेत असलेल्या आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे. 

उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कोकणात थंडी मोठ्या प्रमाणात होती. यामुळे अनेक ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळापत्रकात काहीसा बदल झाला. पहिला नोव्हेंबरमध्ये दुसरा जानेवारीत तर तिसरा फेब्रुवारीत आला. पण, जानेवारीत थंडीचे प्रमाण जास्त राहिल्याने मोहोर जळून गेला. पहिल्या टप्‍प्यातील आंबा आता हळूहळू बाजारात दाखल होत आहे. पण हा टप्पा कमी उत्पादनाचा असल्याने अनेकांचे नियोजन एप्रिल, मे मध्ये येणाऱ्या आंब्यावरच असते. सध्या पुढील दोन महिन्यांत येणारा आंबा तयार होत आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जे आंबे तयार होत आहेत त्यांच्यावर धुक्यामुळे पाण्याचे थेंब जमा होऊन त्यावर डाग येण्याची शक्यता आहे. याचबरोबर रोगांची ही शक्यता असते. कोकणातील काही भागात दररोज एका ठिकाणी धुके अशी परिस्थिती आहे. काही प्रमाणात थंडी ही जाणवत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत असल्याचे चित्र आहे. सध्या अनेक बागांमध्ये लहान लहान आंबे तयार होत आहेत. 

पण धुक्यामुळे छोटे असणारे आंबे गळून पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता वातावरण बदलाचा सामना कसा करायचा या विचारात सध्या कोकणातील बागायतदार आहेत. जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर मुख्य हंगामातच आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
 

प्रतिक्रिया
हवामानामध्ये बदल होत असल्याने आंब्यावर भुरी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उत्पादकांनी तातडीने याबाबत कृषी विभाग किंवा विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी संपर्क करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत प्रयत्न करावेत.
- विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे, कोकण विभाग

धुके पडल्याने आम्हाला यंदाच्या हंगामात येणारा आंबा वाचवण्याचे आव्हान आहे. एकदम सकाळी गडद धुके पडत असल्याने आम्हाला आता नुकसान टाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
- उदय गावडे, आंबा उत्पादक
 

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...
राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी...पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार...
शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दिवसेंदिवस...
मदत हवी दिलासादायकअवकाळी पावसाने राज्यात शेतीच्या झालेल्या...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...