agriculture news in Marathi mango didint flowers in sindhudurg district Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला मोहरच नाही

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडील आंब्याच्या झाडांना मोहर येतो. परंतु यंदा फेब्रुवारी संपत आला तरी झाडांना मोहर आलेला नाही. जेमतेम दहा टक्के झाडांना तो ही किरकोळ स्वरूपात मोहर आलेला आहे. यानंतर मोहर येईल, अशी शक्यता नाही.
— राजाराम वळंज, शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी

सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात अजूनही आंब्याला मोहर आलेला नाही. यानंतर मोहर आला तरी आंबा मे अखेर किंवा जूनमध्ये तयार होईल. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

क्यार वादळामुळे लांबलेला पाऊस आणि हवामानात होणारा सतत बदल यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम लांबणार पडणार हे यापूर्वीच निश्‍चित झाले होते. तरीदेखील नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोहोरणारा आंबा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहरेल अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. परंतु, फेब्रुवारी संपत आला तरी जिल्ह्याच्या अनेक भागात आंब्यांना मोहोर आलेला नाही. 

जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, सांवतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या पश्‍चिमेकडील भागात आंब्याला काही प्रमाणात मोहर आला आहे. काही ठिकाणी फळधारणादेखील झाली आहे. परंतु, जिल्ह्यातील कणकवली, कुडाळचा पूर्वभाग, वैभववाडी या पूर्व पट्ट्यातील तालुक्यांमध्ये अद्याप आंब्याना मोहर फुटलेला नाही. त्यामुळे यानतंर जरी आंब्याना मोहर आला तरी आंबा तयार व्हायला मे अखेर किंवा जून उजाडेल, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

मोहराविषयी अनिश्‍चितता
जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाप्रमाणे पूर्व पट्ट्यातदेखील मोठ्या प्रमाणात आंबा आहे. किनारपट्टी तालुक्यातील आंबा हंगाम मध्यावर असताना पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होतो. मुंबईकर मे महिन्याच्या सुट्टीवर येत असलेल्या कालावधीत हा आंबा तयार होत असल्यामुळे या आंब्याला स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध होते. परंतु, यावर्षी अजूनही मोहोर न आल्यामुळे आंब्याला मोहर येणार की नाही, असा प्रश्‍न बागायतदारांना पडला आहे.

प्रतिक्रिया
या वर्षी आंबा हंगाम काही प्रमाणात उशिराने आहे. आंब्याला मोहर येण्यासाठी आवश्‍यक ताण झाडाला बसणे आवश्‍यक असते. त्यानुसार किनारपट्टी भागात आंब्याना मोहर आला आहे. परंतु, सह्याद्रीपट्ट्यात नेमका मोहर का आला नाही, याबाबत ॲग्रो मेट्रॉलॉजिस्ट आणि हॉर्टिककल्चर विभागांकडून माहिती घेतल्याशिवाय अचूक निदान करता येणार नाही. त्यासंदर्भात लवकरच माहिती घेतली जाईल.
— डॉ. बी.एम. सावंत, संचालक, फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ला


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...