agriculture news in marathi, mango export status, nashik, maharashtra | Agrowon

कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ऑस्ट्रेलियात विक्रमी आंबा निर्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक विकिरण केंद्रातून आंब्यांवर विकिरण प्रक्रिया केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून निर्यात सुरू झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलियातून चांगली मागणी राहिली असून मागील पाच वर्षांतील विक्रम मोडीत निघाले आहेत. 

नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक विकिरण केंद्रातून आंब्यांवर विकिरण प्रक्रिया केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून निर्यात सुरू झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलियातून चांगली मागणी राहिली असून मागील पाच वर्षांतील विक्रम मोडीत निघाले आहेत. 

मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्र संचालित लासलगाव येथील विकिरण केंद्रामध्ये १० एप्रिलपासून आंब्यावर प्रक्रिया सुरू झाली होती. आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून जूनअखेरपर्यंत निर्यात कालावधी निश्चित करण्यात आला होता. अमेरिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियामध्ये मागणी कमी आहे. या दरम्यान ६७९ टन आंबा हवाई मार्गाने निर्यात झाल्याची माहिती कृषकचे निवासी विकिरण सुरक्षा अधिकारी संजय आहेर यांनी दिली. 

अमेरिकेत मानकाप्रमाणे निर्यातपूर्व आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाते. संपूर्ण भारतातून आणलेल्या विविध जातींच्या आंब्यांवर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. कृषक केंद्राची क्षमता अधिक असल्याने मुख्यत्वे हे केंद्र प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. या ठिकाणी गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढविली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होण्यास मदत होते. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहतो.

भारतीय आंब्याच्या हापूससह केशर, बदामी, रत्ना, चौथा, लंगडा व पायरी या वाणांची निर्यात करण्यात आली. मुंबईच्या अॅग्रो सर्ज या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रियेकरिता काम पाहिले. यासाठी अमेरिका कृषी विभाग व भारत सरकारद्वारा फायटोसॅनटरी प्रमाणपत्र देऊन याबाबत कामकाज काटेकोरपणे पार पडले. कृषक या विकिरण प्रक्रिया प्रकल्पात अॅग्रोसर्जईरेडीयेटर्स (इंडिया) प्रा. लि. या कंपनीचे कार्यकारी संचालक प्रणव पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र अवधानी व संजय आहेर यांनी काम पाहिले, तर एकूण १५ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते. 
 
या अमेरिकन शहरात होती मागणी 
कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, होइस्टन, सॅन अंतानिओ, फिनिक्स.
 

कांदा विकिरण प्रकल्पाचा आंब्यावरील प्रक्रियेसाठी वापर 
३१ ऑक्टोबर २००२ रोजी लासलगाव येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते भाभा अणू संशोधन केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आला होता. मात्र, सध्या तो आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी वापरात आहे. हा प्रकल्प सध्या मुंबई येथील अॅग्रोसर्ज ईरेडियेटर्स (इंडिया) प्रा. लि. कंपनी यांना चालविण्यासाठी दिला आहे.

 

निर्यात स्थिती
वर्ष आंब्याची निर्यात (मे. टन)
२०१५ ३५०
२०१६ ५४४
२०१७ ५६७
२०१८ ४९०
२०१९ ६७९

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...