सोलापुरात भरणार आंबा महोत्सव

शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी-विक्री व्हावी, एवढा आमचा उद्देश आहे. कोकणातील आंबा उत्पादकांशी संपर्क साधला आहे. शेतकऱ्यांनीही उत्सुकता दाखवली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा महोत्सव चांगल्या पद्धतीने होईल. - दिलीप नाईक, विभागीय व्यवस्थापक, पणन मंडळ, पुणे
सोलापुरात भरणार आंबा महोत्सव
सोलापुरात भरणार आंबा महोत्सव

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दरवर्षी आंबा महोत्सव भरवण्यात येतो. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे यंदा बाजार समितीला आंबा महोत्सव भरवणे शक्‍य नव्हते. त्यामुळे तो होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण शेतकरी आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पणन मंडळाने स्वतःच त्यासाठी पुढाकार घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापुरात आंबा महोत्सव भरवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी (ता. ५) ते गुरुवार (ता. ९) असा पाच दिवस हा महोत्सव भरणार आहे. 

हुतात्मा स्मृती मंदिराच्या शेजारील वाहनतळावर या महोत्सवाचे रविवारी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होईल. हा महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिरच्या शेजारील वाहनतळावर भरवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसह कोकणातील आंबा उत्पादक या महोत्सवात सहभागी होत आहेत. सुमारे २५ स्टॉल्स या ठिकाणी असतील. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी यांसारख्या कोकणातील विविध हापूसचे प्रकार आणि सोलापूरसह मराठवाड्यातील केसर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com